पपई वरिल इंटरनल ब्लाईट हा रोग क्लॅडोस्पोरीयम या बुरशीमुळे होतो. बुरशी देठाकडुन फळात शिरते. फळात शिरल्यानंतर हि बुरशी फळांतील बियांच्या आसपासच्या परिसरात वाढते, ज्यामुळे फळ आतुन खराब होते. संक्रमण झालेले फळ पक्व होत नाही.
रोगाच्या नियंत्रणासाठी डायथेन एम ४५, झिनेब, मॅनेब, कॉपर हायड्रॉक्साईड, कॉपर ऑक्सिक्लोराईड ची फवारणी घ्यावी.