पपई वरिल काळे ठिपके सरकोस्पोरा पपयी या बुरशी मुळे होतो. पानांवर करड्या तपकिरी रंगाचे ठिपके पडतात. जास्त प्रमाणात संक्रमण असल्यास पपई ची रोगग्रस्त पाने पिवळी पडतात व सुकुन जातात. फळांवर देखिल ठिपके दिसुन येतात.
रोगाच्या नियंत्रणासाठी डायथोन एम ४५, जिनेब, कॅपटन, कॉपर औक्सिक्लोराईड, कॉपर हायड्रॉक्साईड, यापैकी एकाची १० दिवसांच्या अंतराने दोन वेळेस फवारणी घ्यावी.




