वाळवी ही पिकांचे नुकसान करणा-या सामान्य किडीच्या श्रेणीत मोडते. मुख्य हानिकारक किडींमध्ये सामान्यपणे वाळवीचा समावेश होत नाही, परंतू पर्जन्यकाळात याचा प्रादुर्भाव जास्त दिसुन येतो. वाळवी मुख्यतः कुजलेल्या प्राणि किंवा वनस्पतीवर जिवंत राहते पण खाण्यास योग्य पदार्थांची कमी असल्यास सजीव रोपांच्या मुळांमधुन आपले खाद्य घेण्यास सुरवात करते. ही रोपांच्या खोडांच्या आधारे बोगदा करुन मुळापर्यंत पोहोचुन त्यांना हानी पोहोचवते यामुळे रोप कोमेजायला सुरवात होते आणि शेवटी सुकून जाते. वाळवीप्रभावित रोप हातांनी सहजपणे उखडता येते.


