या किडीची अळी हिरव्या रंगाची असते. ही शरीरीचा मधला भाग उंच करुन चालते म्हणुन हीला उंट अळी म्हणतात. ही पाने कुरतडते याची मादी आपल्या जीवनकाळात 400-500 अंडी घालते. अंड्यांमधुन 6-7 दिवसात अळ्या बाहेर पडतात त्या 30 ते 40 दिवसांत सक्रिय राहुन पूर्णपणे विकसित होतात. पूर्ण विकास झालेल्या अळ्या स्वतःला पानांमध्ये गुंडाळून घेतात आणि त्यातुनच एक-दोन आठवड्यांच्या नंतर सोनेरी रंगाचा पतंग बाहेर पडतो.


