logo

हरभरा अन्नद्रव्य व्यवस्थापन –

हरभरा पिकांस स्फुरद, पालाश, कॅल्शियम, झिंक, फेरस, बोरॉन तसेच सल्फर (गंधक) या अन्नद्रव्यांची प्रामुख्याने गरज असते. लागवड करण्यापुर्वी हरभरा पिकांस खालिल प्रमाणे जमिनीतुन खते द्यवीत. प्रमाण किलो प्रती एकर

लागवडीनंतर दिवस नत्र स्फुरद पालाश कॅल्शियम नायट्रेट झिंक सल्फेट फेरस सल्फेट सल्फर बोरॅक्स किंवा २० टक्के बोरॉन
५-१० दिवस १० २५ २५ - - १० - - -
३०-३५ दिवस - - - १० १० - ५०० ग्रॅम
एकुण १० २५ २५ १० १० १० ५०० ग्रॅम

फवारणीतुन अन्नद्रव्य व्यवस्थापन-

पिकाच्या वाढीची अवस्था फवारणीच्या खतांचा प्रकार प्रमाण प्रती लिटर पाणी
लागवडीनंतर १० - १५ दिवसांत 19-19-19 2.5 -3 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये 2.5-3ग्रॅम
वरिल फवारणीनंतर १५ दिवसांनी २० टक्के बोरॉन 1 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये 2.5-3 ग्रॅम
फुलोरा अवस्थेत 00-52-34 4-5 ग्रॅम
मायक्रोन्युट्रीएंटस् (ग्रेड नं २) 2.5-3 ग्रॅम
शेंगा पासत असतांना 00-52-34 4-5 ग्रॅम
बोरॉन 1 ग्रॅम
वरिल फवारणीनंतर ७ दिवसांनी 00-52-34 4-5 ग्रॅम

फुलोरा आणि फलधारणा

फुलांतील पुंकेसर फुल उमलण्याच्या एक दिवस अगोदर मुक्त होतात. ह्या वेळेस स्रीकेसर हे पुकेसरांपासुन दुर असतात, पुकेंसर असलेला देठ त्यानंतर सावकाश पणे स्रीकेसरा कडे वाढत जावुन त्यावर पुकेंसर मुक्त करतो, आणि त्यानंतर परागीभवन होवुन फळ धारणा होते, हि क्रिया दिवसभर सुरु असते. (आर.पी.एस. पुंदिर, इक्रिसॅट, १९९३) हरभरा पिकांत शेंगा तयार होण्याचा कालावधी हा परागीभवनानंतर ५ ते ६ दिवसांनी सुरु होतो. एका रोपावर ३० ते १५० शेंगा (घाटे) तयार होतात. एका शेंग मध्ये १ ते २ दाणे तयार होतात, जास्तीत जास्त ३ दाणे असतात.