logo

घाटे अळी (हेलीकोव्हर्पा अर्मीजेरा) (Helicoverpa Armigera)

या किडीचा पतंग मध्यम आकाराचा असुन पिवळसर –तपकिरी असतो. पुढील पंखांवर तपकिरी रंगाचे ठिपके असतात तर मागील पंखांच्या कडांवर भुरकट रंग असतो. या पतंगाची मादी पानांच्या खालच्या भागावर पिवळसर रंगांची रेषा असणारी अंडी घालते. एक मादी आपल्या जीवनकाळात 5 ते 1000 अंडी देते. ही अंडी 3 ते 10 दिवसांत फुटतात आणि त्यातुन हिरवट रंगाच्या चमकणा-या अळ्या बाहेर दिसु लागतात. प्राथमिक अवस्थेत या अळ्या हरभ-याची पाने, कळ्या आणि फुले खातात. त्यानंतर या अळ्या विकसित होणा-या हरभ-याच्या शेंगामध्ये शिरुन दाणे खातात त्यामुळे शेंगा पोकळ होवुन सुकून पिवळ्या पडतात. यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होतो. खाताना अळ्यांचा मागचा भाग शेंगाच्या बाहेर असतो किंवा सुरवातीलाच संपूर्ण अळी शेंगामध्ये शिरते.

घाटे अळी (हेलीकोव्हर्पा अर्मीजेरा)
घाटे अळी (हेलीकोव्हर्पा अर्मीजेरा)
घाटे अळी (हेलीकोव्हर्पा अर्मीजेरा)
घाटे अळी (हेलीकोव्हर्पा अर्मीजेरा)
घाटे अळी (हेलीकोव्हर्पा अर्मीजेरा)