logo

बुरशीनाशके

ट्रायफ्लॉक्सिस्ट्रोबीन 25% WG ग्रुप ११ I आंतर प्रवाही

व्यापारी नांव ( Tebuconazole 50% + Trifloxystrobin 25% WG) नेटिवो
वर्गिकरण क्यु. ओ. आय. (क्विनोन आउटसाईड इनहिबिटर)
रासायनिक गट ऑक्झिमिनो असिटेटस्
एफ आर ए सी (FRAC) कोड ग्रुप ११
बुरशीमध्ये प्रतिकारक क्षमता निर्माण होण्याचा धोका जास्त
एम ओ ए (MOA) कोड सी श्वसनांत कार्य करते (Respiration)
कार्य प्रकार आंतर प्रवाही

कशासाठी उपयुक्त

 
पिक रोगाचे नांव व्यापारी उत्पादनाचे प्रमाण प्रती ली.
भात शिथ ब्लाईट ०.४ ते ०.५ ग्रॅम
भात लिफ आणि नेक ब्लास्ट ०.४ ते ०.५ ग्रॅम
भात ग्लुम डिसकलरेशन ०.४ ते ०.५ ग्रॅम
केळी सिगाटोका ०.४ ते ०.५ ग्रॅम

ऑस्ट्रेलियातील सदरिल बायर चे उत्पादन केळी वरिल सिगाटोका साठी शिफारस केले गेले आहे.

कार्यपद्धती

या ठिकाणी केवळ ट्रायफ्लॉक्सिस्ट्रोबीन बाबत माहीत देण्यात आली आहे. बाजारात उपलब्ध असणारे टेब्युकोनॅझोल आणि ट्रायफ्लॉक्सिस्ट्रोबीन यांचे मिश्रण हे , मध्यम आणि जास्त प्रमाणात प्रतिकारक शक्ती निर्मिण होणारे उत्पादन आहे. त्यामुळे वापर काळजीपुर्वक करावा. स्थानिक रित्या आंतर प्रवाही, पुर्णतः आंतरप्रवाही नाही. बुरशीच्या पेशीतील मायटोकॉन्ड्रियावर हल्ला करुन अन्न निर्मिती (श्वसन) बंद पाडते. बहु विध बुरशीनाशक प्रतिबंधकात्मक आणि उपचारात्मक क्रिया.

पर्यावरण व दक्षता

बाजारात उपलब्ध असणारे टेब्युकोनॅझोल आणि ट्रायफ्लॉक्सिस्ट्रोबीन यांचे मिश्रण हे , मध्यम आणि जास्त प्रमाणात प्रतिकारक शक्ती निर्मिण होणारे उत्पादन आहे. त्यामुळे वापर काळजीपुर्वक करावा. एफआरएसी नुसार रोगांच्या बुरशीमध्ये या बुरशीनाशकाच्या प्रती प्रतिकारक शक्ती निर्माण होण्याचा धोका आहे. रोगग्रस्त भागावरिल एकुण बुरशीच्या संख्ये पैकि काहीं बुरशी ह्या बुरशीनाशकांस प्रतिकारक असु शकतात, अशा वेळेस हे बुरशीनाशक वापरुन नियंत्रण न झाल्यास किंवा अशा वेळेस पुर्ण नियंत्रण होणे याची शक्यता कमी असते, त्यामुळे पुन्हा वापर करु नये तसेच या गटतील इतर कोणत्याही बुरशीनाशकाचा वापर करु नये. असे केल्याने बुरशीच्या मध्ये जास्त प्रमाणात प्रतिकारक क्षमता निर्माण होणे थांबवले जाईल. कोणत्याही एडिटिव्ह (स्टिकर, स्प्रेडर) सोबत वापरु नये. मधमाशांसाठी हानीकारक नाही. केळी पिकावर अती उच्च दर्जाच्या नॅरो रेंज मिनरल ऑईल सोबत वापरता येते, मात्र फळांवर डाग पडु शकतात. सतत दोन वेळेस फवारणी घेवु नये. केळी पिकांत १२ महिन्यांत ४ पेक्षा जास्त वेळेस वापरक करु नये.