logo

बुरशीनाशके

थायोफिनेट मिथाईल ७०%WP ग्रुप १ I आंतरप्रवाही

व्यापारी नांव रोको, टॉपसिन
वर्गिकरण मिथिल बेन्झामिडोझोल कार्बामेटस
रासायनिक गट थायोफिनेटस
एफ आर ए सी (FRAC) कोड ग्रुप १
बुरशीमध्ये प्रतिकारक क्षमता निर्माण होण्याचा धोका जास्त
एम ओ ए (MOA) कोड मायटॉसिस आणि पेशी विभाजन
कार्य प्रकार आंतरप्रवाही

कशासाठी उपयुक्त

पिक रोगाचे नांव व्यापारी उत्पादनाचे प्रमाण प्रती ली.
पपई भुरी १ ग्रॅम
सफरचंद स्कॅब १ ग्रॅम
गहु ब्राऊन रस्ट १ ग्रॅम
लिफ ब्लाईट २ ग्रॅम
टोमॅटो रिंग रॉट १ ग्रॅम
भोपळा एथ्रॅक्नोज १ ग्रॅम
चवळी फ्युजॅरियम विल्ट १ ग्रॅम
काकडी वर्गिय भुरी १ ग्रॅम

कंपनी द्वारे शिफारस किंवा इतर देशातील शिफारस

केळी सिगाटोका -
कापुस कॉलर रॉट -
टोमॅटो स्टेम रॉट -
टरबुज एथ्रॅक्नोज -
टोमॅटो ग्रे मोल्ड -
वांगी ग्ले मोल्ड -
बटाटा ब्लॅक स्कार्फ -
मिरची भुरी -
कांदा ग्रे मोल्ड -

कार्यपद्धती

पेशी विभाजनातील ट्युबीलीन ची निर्मिती थांबवते. पानांच्या पृष्टभागावरुन आत जाण्याची क्षमता आहे. तसेच पानांच्या आंत देखिल प्रवास करु शकते. रस वाहीन्यांमध्ये वहनशिल पिकावरिल पानांच्या आत थायोफिनेट मिथाईल चे रुपांतर मिथिल बेन्झिमिडॅझोल कार्बामेट मध्ये होते. हा घटक बुरशीसाठी विषारी असतो. प्रतिबंधकात्मक आणि उपचारात्मक क्रिया मायकोटॉक्सिन्स च्या निर्मितीस प्रतिबंध करते.

पर्यावरण व दक्षता

पाण्याच्या स्रोतांच्या प्रदुषणास कारणीभुत असल्याने वापर काळजीपुर्वक करावा. पिकाच्या मुळांद्वार शोषुन घेण्याची क्षमता आहे. जमिनीत ७ दिवसांत विघटन पावते. मिथिल बेन्झिमिडॅझोल कार्बामेट च्या विघटनांस ६० दिवसांपेक्षा जास्त कालावधी गरजेचा असतो. एफआरएसी नुसार रोगांच्या बुरशीमध्ये या बुरशीनाशकाच्या प्रती प्रतिकारक शक्ती निर्माण होण्याचा धोका आहे. रोगग्रस्त भागावरिल एकुण बुरशीच्या संख्ये पैकि काहीं बुरशी ह्या बुरशीनाशकांस प्रतिकारक असु शकतात, अशा वेळेस हे बुरशीनाशक वापरुन नियंत्रण न झाल्यास किंवा अशा वेळेस पुर्ण नियंत्रण होणे याची शक्यता कमी असते, त्यामुळे पुन्हा वापर करु नये तसेच या गटतील इतर कोणत्याही बुरशीनाशकाचा वापर करु नये. असे केल्याने बुरशीच्या मध्ये जास्त प्रमाणात प्रतिकारक क्षमता निर्माण होणे थांबवले जाईल.