logo

बुरशीनाशके

प्रोपिकोनॅझोल 25% EC ग्रुप ३ I आंतर प्रवाही

व्यापारी नांव टिल्ट
वर्गिकरण डि. एम. आय. (डिमिथिलेशन इनहिबटर)
रासायनिक गट  ट्रायझोल्स
एफ आर ए सी (FRAC) कोड ग्रुप ३
बुरशीमध्ये प्रतिकारक क्षमता निर्माण होण्याचा धोका मध्यम
एम ओ ए (MOA) कोड स्टेरॉल ची निर्मिती थांबवते.
कार्य प्रकार आंतर प्रवाही

कशासाठी उपयुक्त

पिक रोगाचे नांव व्यापारी उत्पादनाचे प्रमाण प्रती ली.
गहु कर्नेल बंट (Neovossia indica) ०.६ मिली
लिफ रस्ट/ब्राउन रस्ट (Puccinia recondite F. sp. tritici) ०.६ मिली
स्टेम रस्ट (B. graminis f. sp. tritici) ०.६ मिली
स्ट्राईप रस्ट / यलो र्सट (P. striiformis) ०.६ मिली
भात शिथ ब्लाईट (Rhizoctonia solani f. sesakii) ०.६ मिली
भुईमुग अर्ली लिफ स्पॉट
(Cercospora arachidicola)
०.६ मिली
लेट लिफ स्पॉट
(C. personata)
०.६ मिली
रस्ट (Puccinia arachidis) ०.६ मिली
चहा ब्लिस्टर ब्लाईट ०.५ ते १ मिली
सोयाबीन रस्ट ०.६ मिली
केळी सिगाटोका ०.६ मिली
कॉफी लिफ रस्ट 0.02%

कार्यपद्धती

आंतर प्रवाही आणि रेसिड्युअल (दिर्घ कालीन परिणाम) बुरशीनाशक. पिकामध्ये केवळ वरच्या दिशेने (मुळां कडुन शेंड्या कडे) रस वाहीन्यांद्वारे प्रवास होतो. बुरशीची वाढ थांबवते मात्र झु-स्पोअर्स वर परिणाम होत नाही.

पर्यावरण व दक्षता

पक्षी, मधमाशा व मासे व यासाठी घातक नाही. जमिनीतील अर्ध आयुष्य हे ७ ते १७० दिवसांचे असते. सर्वसाधारण पणे ७० दिवसांचे अर्ध आयुष्य ओलसर जमिनीत दिसुन येते. सुर्यप्रकाशात लवकर विघटन होते. मातीच्या कणांना कमी प्रमाणात चिकटते. पाण्यात जास्त प्रमाणात विरघळत असल्याने पाणी साठ्याचे प्रदुषण करु शकते. पाण्यातील अर्ध आयुष्य हे २८ दिवसांचे आहे, सुर्यप्रकाशामुळे अर्ध आयुष्य ७ दिवसांपर्यंत मर्यादित राहते. जमिनीतुन पिकाच्या मुळांद्वार शोषुन घेतले जात नाही. एफआरएसी नुसार रोगांच्या बुरशीमध्ये या बुरशीनाशकाच्या प्रती प्रतिकारक शक्ती निर्माण होण्याचा धोका आहे. रोगग्रस्त भागावरिल एकुण बुरशीच्या संख्ये पैकि काहीं बुरशी ह्या बुरशीनाशकांस प्रतिकारक असु शकतात, अशा वेळेस हे बुरशीनाशक वापरुन नियंत्रण न झाल्यास किंवा अशा वेळेस पुर्ण नियंत्रण होणे याची शक्यता कमी असते, त्यामुळे पुन्हा वापर करु नये तसेच या गटतील इतर कोणत्याही बुरशीनाशकाचा वापर करु नये. असे केल्याने बुरशीच्या मध्ये जास्त प्रमाणात प्रतिकारक क्षमता निर्माण होणे थांबवले जाईल.