logo

बुरशीनाशके

पायरॅक्लोस्ट्रोबीन ग्रुप ११ I स्थानिक आंतरप्रवाही

व्यापारी नांव हेडलाईन (पायरॅक्लोस्ट्रोबीन २०%WG) कॅब्रीओ टॉप (मेटिराम 55% + पायरॅक्लोस्ट्रोबीन 5% WG)
वर्गिकरण  क्विनोन आउटसाईड इनहिबिटर (QoI)
रासायनिक गट मेथॉक्झिकार्बामेटस्
एफ आर ए सी (FRAC) कोड ग्रुप ११
बुरशीमध्ये प्रतिकारक क्षमता निर्माण होण्याचा धोका जास्त
एम ओ ए (MOA) कोड सी ३ – कॉम्प्लेक्स ३ – सायटोक्रोम बीसी १ – श्वसनात कार्य करते.
कार्य प्रकार स्थानिक आंतरप्रवाही

कशासाठी उपयुक्त

Pyraclostrobin 20% WG

पिक रोगाचे नांव व्यापारी उत्पादनाचे प्रमाण प्रती ली.
टोमॅटो अर्ली ब्लाईट ०.७५ ते १ ग्रॅम

Metiram 55% + Pyraclostrobin 5% WG

टोमॅटो अर्ली ब्लाईट ३ ग्रॅम
बटाटा लेट ब्लाईट ३ ग्रॅम
द्राक्ष डाऊनी मिल्ड्यु ३ ग्रॅम

कार्यपद्धती

स्थानिक आंतर प्रवाही बुरशीनाशक पानांच्या वरिल बाजुस फवारले असता, पानांच्या खालिल बाजुस काही प्रमाणात वाहुन नेले जाते. प्रतिबंधकात्मक क्रिया बुरशीच्या पेशीतील मायटोकॉन्ड्रियल श्वसनांत अडथळा निर्माण करुन पेशीतील अन्ननिर्मिती बंद पाडते. बुरशीच्या स्पोअर्स चे रुजणे व सुरवातीची वाढ या विरुद्धच जास्त परिणामकारक.

पर्यावरण व दक्षता

एफआरएसी नुसार रोगांच्या बुरशीमध्ये या बुरशीनाशकाच्या प्रती प्रतिकारक शक्ती निर्माण होण्याचा धोका आहे. पायरॅक्लॅस्ट्रोबीन बाबत जास्त धोका आहे, तर मेटिराम बाबत कमी धोका आहे. रोगग्रस्त भागावरिल एकुण बुरशीच्या संख्ये पैकि काहीं बुरशी ह्या बुरशीनाशकांस प्रतिकारक असु शकतात, अशा वेळेस हे बुरशीनाशक वापरुन नियंत्रण न झाल्यास किंवा अशा वेळेस पुर्ण नियंत्रण होणे याची शक्यता कमी असते, त्यामुळे पुन्हा वापर करु नये तसेच या गटतील इतर कोणत्याही बुरशीनाशकाचा वापर करु नये. असे केल्याने बुरशीच्या मध्ये जास्त प्रमाणात प्रतिकारक क्षमता निर्माण होणे थांबवले जाईल. ज्यावेळेस ग्रुप ११ मधिल बुरशीनाशकांचा वापर हा फवारणीच्या कार्यक्रमात करावयाचा असतो, त्यावेळेस या गटातील बुरशीनाशकांच्या फवारण्या ह्या एकुण सर्वच फवारण्यांच्या १/३ इतकेच असावे. (उदा. एकुण १० फवारण्या बुरशीनाशकांच्या होणार असतिल तर ग्रुप ११ गटातील बुरशीनाशके केवळ ३ वेळेस वापरावीत.) ज्यावेळेस ग्रुप ११ व इतर ग्रुप मधिल बुरशीनाशकांचे मिश्रण फवारावयाचे असेल त्यावेळेस हि संख्या एकुण बुरशीनाशके फवारणीच्या १/२ इतकेच असावी. (उदा. एकुण १० फवारण्या बुरशीनाशकांच्या होणार असतिल तर ग्रुप ११ गटातील बुरशीनाशके केवळ ५ वेळेस वापरावीत.) एका हंगामात २ पेक्षा जास्त वेळेस वापरु नये.