logo

बुरशीनाशके

मेटालॅक्झिल – एम 31.8% ES (मेफोनॉझ्काम) ग्रुप ४ I आंतर प्रवाही

व्यापारी नांव रिडोमिल गोल्ड
वर्गिकरण फिनिलअमाईड (पीए)
रासायनिक गट फिनिलअमाईड
एफ आर ए सी (FRAC) कोड ग्रुप 4
बुरशीमध्ये प्रतिकारक क्षमता निर्माण होण्याचा धोका जास्त
एम ओ ए (MOA) कोड उमायसिटस् विरुद्ध प्रभावशाली, आर.एन.ए. निर्मिती थांबवते
कार्य प्रकार आंतर प्रवाही, बीज प्रक्रियेसाठी वापरले जाते.

कशासाठी उपयुक्त

 
मका डाऊनी मिल्ड्यु २.४ मिली प्रती १ कि. बीज
बाजरी डाऊनी मिल्ड्यु २.४ मिली प्रती १ कि. बीज
ज्वारी डाऊनी मिल्ड्यु २.४ मिली प्रती १ कि. बीज
सुर्यफुल डाऊनी मिल्ड्यु २.४ मिली प्रती १ कि. बीज

कार्यपद्धती

आंतर प्रवाही आणि रेसिड्युअल (दिर्घ कालीन परिणाम) बुरशीनाशक. पिकामध्ये केवळ वरच्या दिशेने (मुळां कडुन शेंड्या कडे) रस वाहीन्यांद्वारे प्रवास होतो. बुरशीची वाढ थांबवते मात्र झु-स्पोअर्स वर परिणाम होत नाही.

पर्यावरण व दक्षता

पक्षी, मधमाशा व मासे व यासाठी घातक नाही. जमिनीतील अर्ध आयुष्य हे ७ ते १७० दिवसांचे असते. सर्वसाधारण पणे ७० दिवसांचे अर्ध आयुष्य ओलसर जमिनीत दिसुन येते. सुर्यप्रकाशात लवकर विघटन होते. मातीच्या कणांना कमी प्रमाणात चिकटते. पाण्यात जास्त प्रमाणात विरघळत असल्याने पाणी साठ्याचे प्रदुषण करु शकते. पाण्यातील अर्ध आयुष्य हे २८ दिवसांचे आहे, सुर्यप्रकाशामुळे अर्ध आयुष्य ७ दिवसांपर्यंत मर्यादित राहते. जमिनीतुन पिकाच्या मुळांद्वार शोषुन घेतले जात नाही. एफआरएसी नुसार रोगांच्या बुरशीमध्ये या बुरशीनाशकाच्या प्रती प्रतिकारक शक्ती निर्माण होण्याचा धोका आहे. रोगग्रस्त भागावरिल एकुण बुरशीच्या संख्ये पैकि काहीं बुरशी ह्या बुरशीनाशकांस प्रतिकारक असु शकतात, अशा वेळेस हे बुरशीनाशक वापरुन नियंत्रण न झाल्यास किंवा अशा वेळेस पुर्ण नियंत्रण होणे याची शक्यता कमी असते, त्यामुळे पुन्हा वापर करु नये तसेच या गटतील इतर कोणत्याही बुरशीनाशकाचा वापर करु नये. असे केल्याने बुरशीच्या मध्ये जास्त प्रमाणात प्रतिकारक क्षमता निर्माण होणे थांबवले जाईल.