logo

बुरशीनाशके

क्रासोक्झोम मिथाईल 44.3% SC ग्रुप ११ I आंतर प्रवाही

व्यापारी नांव एलेग्रो, सिग्नस
वर्गिकरण क्यु. ओ. आय. (क्विनोन आउटसाईड इनहिबिटर)
रासायनिक गट  ऑक्झिमिनो असिटेटस्
एफ आर ए सी (FRAC) कोड ग्रुप 11
बुरशीमध्ये प्रतिकारक क्षमता निर्माण होण्याचा धोका जास्त
एम ओ ए (MOA) कोड सी श्वसनांत कार्य करते (Respiration)
कार्य प्रकार आंतर प्रवाही बुरशीनाशक

कशासाठी उपयुक्त

पिक रोगाचे नांव व्यापारी उत्पादनाचे प्रमाण प्रती ली.
भात ब्लास्ट, शिथ ब्लाईट १ मिली
द्राक्ष भुरी, डाऊनी मिल्ड्यु १.२५ मिली

कार्यपद्धती

मुळांद्वारा देखिल शोषुन घेतले जाते. पिकाच्या रस वाहीन्यांतुन वाहत मुळांकडुन, रोपाच्या टोकाकडे प्रवास करते. पानांवर फवारणी केल्यास पानांच्या टोकाकडे व किनारी भागाकडे प्रवास करते. रोग कारक बुरशीच्या पेशीतील मायटोकॉन्ड्रियल श्वसन क्रिया बंद पाडते. स्पोअर्स (बीजाणू) रुजणे, तयार होणे बंद पाडते. बुरशीची शारीरीक वाढ थांबवते.

पर्यावरण व दक्षता

या बुरशीनाशकासोबत अडेटिव्ह किंवा अडजुव्हंट वापरण्याची शिफारस नाही. पिकावर फवारणी योग्य रित्या घ्यावी. जमिनीत आणि पाण्यात लवकर विघटन पावते. केवळ सिंगल साईट क्रिया असल्याने बुरशीमध्ये प्रतिकारक शक्ती निर्माण होण्याचा धोका जास्त असतो. पिकावर शिफारस केलेल्या प्रमाणात वापरल्यास मधमाशी, गांडुळ, पक्षी यासाठी धोकेदायक नाही. एफआरएसी नुसार रोगांच्या बुरशीमध्ये या बुरशीनाशकाच्या प्रती प्रतिकारक शक्ती निर्माण होण्याचा धोका आहे. रोगग्रस्त भागावरिल एकुण बुरशीच्या संख्ये पैकि काहीं बुरशी ह्या बुरशीनाशकांस प्रतिकारक असु शकतात, अशा वेळेस हे बुरशीनाशक वापरुन नियंत्रण न झाल्यास किंवा अशा वेळेस पुर्ण नियंत्रण होणे याची शक्यता कमी असते, त्यामुळे पुन्हा वापर करु नये तसेच या गटतील इतर कोणत्याही बुरशीनाशकाचा वापर करु नये. असे केल्याने बुरशीच्या मध्ये जास्त प्रमाणात प्रतिकारक क्षमता निर्माण होणे थांबवले जाईल.