logo

बुरशीनाशके

कासुगामायसिन 3% SL ग्रुप २४ I आंतर प्रवाही

व्यापारी नांव ओमायसिन
वर्गिकरण हेक्सापायरॅनोसोल एन्टिबायोटिक
रासायनिक गट हेक्सापायरॅनोसोल एन्टिबायोटिक
एफ आर ए सी (FRAC) कोड ग्रुप 24
बुरशीमध्ये प्रतिकारक क्षमता निर्माण होण्याचा धोका मध्यम
एम ओ ए (MOA) कोड डी ३, अमिनो असिड आणि प्रोटीन्स निर्मिती
कार्य प्रकार आंतर प्रवाही बुरशीनाशक

कशासाठी उपयुक्त

पिक रोगाचे नांव व्यापारी उत्पादनाचे प्रमाण प्रती ली.
भात ब्लास्ट १ ते १.५ मिली

याशिवाय उत्पादक कंपनी खालील रोगांसाठी शिफारस करते.

टोमॅटो बॅक्टोरियल कॅकर -
  लिफ मोल्ड -
संत्री कँकर -
डाळींब फळांवरिल डाग -
कांदा बॅक्टेरियल रॉट -
कोबी ब्लॅक रॉट -
मिरची बॅक्टेरियल लिफ स्पॉट -
टरबुज, खरबुज बॅक्टेरियल अन्थ्रॅकनोज, अग्युलर लिफ स्पॉट -
काकडी अग्युलर लिफ स्पॉट -

कार्यपद्धती

प्रतिबंधकात्मक आणि उपचारात्मक क्रिया बुरशी व जीवाणूंच्या पेशीतील प्रोटिन निर्मिती यंत्रणा बंद पाडते. आंतर प्रवाही क्रिया. ग्रॅम पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जीवाणूंच्या विरुद्ध देखिल प्रभावी.

पर्यावरण व दक्षता

एफआरएसी नुसार रोगांच्या बुरशीमध्ये या बुरशीनाशकाच्या प्रती प्रतिकारक शक्ती निर्माण होण्याचा धोका आहे. रोगग्रस्त भागावरिल एकुण बुरशीच्या संख्ये पैकि काहीं बुरशी ह्या बुरशीनाशकांस प्रतिकारक असु शकतात, अशा वेळेस हे बुरशीनाशक वापरुन नियंत्रण न झाल्यास किंवा अशा वेळेस पुर्ण नियंत्रण होणे याची शक्यता कमी असते, त्यामुळे पुन्हा वापर करु नये तसेच या गटतील इतर कोणत्याही बुरशीनाशकाचा वापर करु नये. असे केल्याने बुरशीच्या मध्ये जास्त प्रमाणात प्रतिकारक क्षमता निर्माण होणे थांबवले जाईल.