logo

बुरशीनाशके

इप्रिडीऑन 50%WP ग्रुप २ I स्पर्शजन्य

व्यापारी नांव रोव्हरॉल क्विंटाल (इप्रिडीऑन 25% + कार्बेन्डाझिम 25% WP)
वर्गिकरण डायकार्बोक्सिमाईडस
रासायनिक गट डायकार्बोक्सिमाईडस
एफ आर ए सी (FRAC) कोड ग्रुप 2
बुरशीमध्ये प्रतिकारक क्षमता निर्माण होण्याचा धोका मध्यम ते जास्त
एम ओ ए (MOA) कोड  इ३, ऑसमॉटिक सिग्नल ट्रांनडक्शन मधिल हिस्टिडीन आणि कायनेज
कार्य प्रकार स्पर्शजन्य बुरशीनाशक

कशासाठी उपयुक्त

पिक रोगाचे नांव व्यापारी उत्पादनाचे प्रमाण प्रती ली.
मोहरी अल्टरनॅरिया ब्लाईट २ ते ३ ग्रॅम
भात शिथ ब्लाईट ३ ग्रॅम
टोमॅटो अर्ली ब्लाईट ३ ग्रॅम
द्राक्ष अन्थ्रॅकनोझ २ ते ४ ग्रॅम

इप्रिडीऑन 25% + कार्बेन्डाझिम 25% WP

भात शिथ ब्लाईट १ ग्रॅम

कार्यपद्धती

स्पर्शजन्य, प्रतिबंधकात्मक आणि उपचारात्मक बुरशीनाशक बुरशीतील डीएनए आणि आरएनए निर्मिती तसेच पेशी विभाजन थांबवुन, बुरशीची शाकिय वाढ बंद पाडते. स्पोअर्स(बीजाणू) ची रुजण्याची क्रिया बंद पाडते.

पर्यावरण व दक्षता

फवारणीचे द्रावण बनवल्या दिवशींच वापरावे. नॉन अयोनिक सरफेक्टंट चा वापर फायदेशिर ठरतो. फवारणीचे द्रावण पिकावर एकसमान पसरणे गरजेचे आहे. वातावरणात जास्त आद्रता असतांना किंवा पाऊस अपेक्षित असेल तर फवारणी करु नये. ग्रुप २ गटातील बुरशीनाशक वांरवार वापर केल्यास परिणाम शुन्य देखिल मिळतात. जमिनीतील अर्ध आय़ुष्य हे १४ दिवसांचे असते, मात्र जमिनीचा सामु, चिकटपणा, प्रकार आणि इप्रिडीऑन वापराचा इतिहास यानुसार २ ते ६० दिवसांचा राहु शकतो. जमिनतील सुक्ष्म जीवांवर अल्प परिणाम तसेच मधमाशांसाठी सुरक्षित आहे. एफआरएसी नुसार रोगांच्या बुरशीमध्ये या बुरशीनाशकाच्या प्रती प्रतिकारक शक्ती निर्माण होण्याचा धोका आहे. रोगग्रस्त भागावरिल एकुण बुरशीच्या संख्ये पैकि काहीं बुरशी ह्या बुरशीनाशकांस प्रतिकारक असु शकतात, अशा वेळेस हे बुरशीनाशक वापरुन नियंत्रण न झाल्यास किंवा अशा वेळेस पुर्ण नियंत्रण होणे याची शक्यता कमी असते, त्यामुळे पुन्हा वापर करु नये तसेच या गटतील इतर कोणत्याही बुरशीनाशकाचा वापर करु नये. असे केल्याने बुरशीच्या मध्ये जास्त प्रमाणात प्रतिकारक क्षमता निर्माण होणे थांबवले जाईल.