logo

बुरशीनाशके

हेक्झाकोनॅझोल ग्रुप ३ I आंतरप्रवाही

व्यापारी नांव कॅपटाफ व ईतर व्यापारी नावांनी उपलब्ध
वर्गिकरण डि एम आय (डि मिथिलेशन इनहिबिटर) बुरशीनाशक
रासायनिक गट ट्रायझोल्स
एफ आर ए सी (FRAC) कोड ग्रुप ३
बुरशीमध्ये प्रतिकारक क्षमता निर्माण होण्याचा धोका  मध्यम
एम ओ ए (MOA) कोड पेशी भित्तिकेतील स्टेरॉल निर्मिती
कार्य प्रकार आंतर प्रवाही बुरशीनाशक

कशासाठी उपयुक्त

हेक्झाकोनॅझोल 2% SC

पिक रोगाचे नांव व्यापारी उत्पादनाचे प्रमाण प्रती ली.
मिरची भुरी आणि फळकुज ३ - ६ मिली
बटाटा अर्ली आणि लेट ब्लाईट ३ -६ मिली
द्राक्ष भुरी ३ – ६ मिली

हेक्झाकोनॅझोल 5% EC

पिक रोगाचे नांव व्यापारी उत्पादनाचे प्रमाण प्रती ली.
सफरचंद स्कॅब ०.५ मिली
भात ब्लास्ट, शिथ ब्लाईट २ मिली
भुईमुग टिक्का ३ मिली
आंबा भुरी १ मिली
सोयाबीन रस्ट १ मिली
चहा ब्लिस्टर ब्लाईट १ मिली
द्राक्ष भुरी १ ते २ मिली

हेक्झाकोनॅझोल 5 % SC

पिक रोगाचे नांव व्यापारी उत्पादनाचे प्रमाण प्रती ली.
आंबा भुरी २ मिली
भात शिथ ब्लाईट २ मिली
द्राक्ष भुरी १ ते २ मिली

कार्यपद्धती

प्रतिबंधकात्मक आणि उपचारात्मक क्रिया असलेले आंतरप्रवाही बुरशीनाशक फॉसेटिल ए-एल हे पिकाच्या पानांद्वारा त्वरित शोषुन घेतले जाते. पिकाच्या आंत मुळांकडुन पानांकडे आणि याच्या विरुद्ध दिशेने प्रवास करण्यास सक्षम. बुरशीच्या स्पोअर्स (बीजाणू) चे रुजणे आणि बुरशीच्या पानांच्या आत शिरणे याविरुद्ध कार्य करते. बुरशीची शारिरिक वाढ थांबवते तसेच पिकाची स्वतःची प्रतिकारक शक्ती देखिल वाढवते.

पर्यावरण व दक्षता

डोळे, त्वचा यांस हानीकारक प्रतिकारक बुरशींच्या प्रती प्रभावहिन एफआरएसी नुसार रोगांच्या बुरशीमध्ये या बुरशीनाशकाच्या प्रती प्रतिकारक शक्ती निर्माण होण्याचा धोका आहे. रोगग्रस्त भागावरिल एकुण बुरशीच्या संख्ये पैकि काहीं बुरशी ह्या बुरशीनाशकांस प्रतिकारक असु शकतात, अशा वेळेस हे बुरशीनाशक वापरुन नियंत्रण न झाल्यास किंवा अशा वेळेस पुर्ण नियंत्रण होणे याची शक्यता कमी असते, त्यामुळे पुन्हा वापर करु नये तसेच या गटतील इतर कोणत्याही बुरशीनाशकाचा वापर करु नये. असे केल्याने बुरशीच्या मध्ये जास्त प्रमाणात प्रतिकारक क्षमता निर्माण होणे थांबवले जाईल.