logo

बुरशीनाशके

फॉसेटिल ए-एल 80% WP ग्रुप ३३ I आंतरप्रवाही

व्यापारी नांव अलिएट
वर्गिकरण फॉस्फोनेटस्
रासायनिक गट इथिल फॉस्फोनेटस
एफ आर ए सी (FRAC) कोड ग्रुप ३३
बुरशीमध्ये प्रतिकारक क्षमता निर्माण होण्याचा धोका कमी, केवळ काही बुरशींत प्रतिकारक शक्ती आढळुन आली.
एम ओ ए (MOA) कोड माहीती उपलब्ध नाही
कार्य प्रकार आंतर प्रवाही बुरशीनाशक

कशासाठी उपयुक्त

पिक रोगाचे नांव व्यापारी उत्पादनाचे प्रमाण प्रती ली.
द्राक्ष डाऊनी मिल्डयु २ ग्रॅम

इतर देशात शिफारस

कांदा अल्टरनॅरिया २ ग्रॅम

इतर पिकांवरिलफायटोप्थोरा, पिथियम, क्राऊन रॉट, आणि डाऊनी मिल्ड्यु-

कार्यपद्धती

प्रतिबंधकात्मक आणि उपचारात्मक क्रिया असलेले आंतरप्रवाही बुरशीनाशक फॉसेटिल ए-एल हे पिकाच्या पानांद्वारा त्वरित शोषुन घेतले जाते. पिकाच्या आंत मुळांकडुन पानांकडे आणि याच्या विरुद्ध दिशेने प्रवास करण्यास सक्षम. बुरशीच्या स्पोअर्स (बीजाणू) चे रुजणे आणि बुरशीच्या पानांच्या आत शिरणे याविरुद्ध कार्य करते. बुरशीची शारिरिक वाढ थांबवते तसेच पिकाची स्वतःची प्रतिकारक शक्ती देखिल वाढवते.

पर्यावरण व दक्षता

प्रतिबंधकात्मक म्हणुन केलेला वापर हा जास्त फायदेशिर ठरतो. पिकावर रोगाची सुरवातीची लक्षणे असतांना त्वरित वापर करावा. पिकाची वाढ जोमात असतांना केलेला वापर हा जास्त फायदेशिर ठरतो. फवारणीच्या खतांसोबत वापर करु नये. कॉपर युक्त बुरशीनाशंकासोबत वापर केल्यास पिकांस ईजा होण्याचा धोका असतो. जर उत्पादन केक सारखे किंवा गोळा झाले असेल तर वापर टाळावा. मधमाशांसाठी हानीकारक नाही. जमिनीत विना-नुकसानकारक अशा स्वरुपात लवकर विघटन पावते.