logo

बुरशीनाशके

फॅमोक्झोडोन १६.६% SC ग्रुप ११ I स्पर्शजन्य

व्यापारी नांव इक्वेशन प्रो (फॅमोक्झोडोन १६.६% + सायमॉक्झानिल % SC)
वर्गिकरण  क्विनोन आउटसाईड इनहिबिटर (QoI)
रासायनिक गट ऑक्झाझोलीडाईन डायोन्स
एफ आर ए सी (FRAC) कोड ग्रुप ११
बुरशीमध्ये प्रतिकारक क्षमता निर्माण होण्याचा धोका जास्त
एम ओ ए (MOA) कोड सायटोक्रोम बीसी १ – श्वसनात कार्य करते.
कार्य प्रकार स्पर्शजन्य

कशासाठी उपयुक्त

Famoxadone 16.6% + Cymoxanil 22.1% SC

पिक रोगाचे नांव व्यापारी उत्पादनाचे प्रमाण प्रती ली.
द्राक्ष डाऊनी मिल्ड्यु १ मिली
बटाटा लेट ब्लाईट १ मिली
टोमॅटो अर्ली आणि लेट ब्लाईट १ मिली

कार्यपद्धती

फॅमोक्झोडोन हे प्रतिबंधकात्मक, रेसिड्युअल (जास्त काळ परिणाम दाखवणारे, एम.आर.एल संबंधीत उल्लेख नाही, द्राक्ष बागायतदारांनी कृपया सध्याचे एम.आर.एल. बघुन वापर करावा.) यांस बुरशी ते स्पोअर्स तयार होणे व स्पोअर्स (बीजाणू) रुजणे या क्रिया थांबविण्याची शक्ती प्राप्त आहे. फॅमोक्झोडोन चा वापर हा रोग येण्यापुर्वी (प्रतिबंधकात्मक) व रोगाच्या सुरवातीच्या लागण होण्याच्या वेळेस जेव्हा रोगाची लक्षणे दिसत नाहीत तेव्हा करणे जास्तीत जास्त परिणामकारक होते. फॅमोक्झोडोन हे पानांच्या वरिल मेणांच्या थरावर (Wax layer of Cuticle) राहते.

पर्यावरण व दक्षता

फवारणीनंतर तिन तासांत पाऊस झाल्यास पुन्हा वापर करावा. द्राक्षांवर पहीली फवारणी शेंडा १० सें.मी. असतांना व त्यानंतर रोगाच्या वाढीस असलेली अनुकुलता बघुन ७ ते १४ दिवसांनी दुसरी फवारणी घ्यावी. ५ पेक्षा जास्त फवारण्या घेवु नयेत. पिकाची वाढ खुंटलेली असतांना, पिकावर ताण असतांना, फवारणी करु नये. एफआरएसी नुसार रोगांच्या बुरशीमध्ये या बुरशीनाशकाच्या प्रती प्रतिकारक शक्ती निर्माण होण्याचा धोका आहे. फेमॉक्झोडोन बाबत जास्त धोका आहे, तर सायमॉक्झानिल बाबत मध्यम धोका आहे. रोगग्रस्त भागावरिल एकुण बुरशीच्या संख्ये पैकि काहीं बुरशी ह्या बुरशीनाशकांस प्रतिकारक असु शकतात, अशा वेळेस हे बुरशीनाशक वापरुन नियंत्रण न झाल्यास किंवा अशा वेळेस पुर्ण नियंत्रण होणे याची शक्यता कमी असते, त्यामुळे पुन्हा वापर करु नये तसेच या गटतील इतर कोणत्याही बुरशीनाशकाचा वापर करु नये. असे केल्याने बुरशीच्या मध्ये जास्त प्रमाणात प्रतिकारक क्षमता निर्माण होणे थांबवले जाईल.