logo

बुरशीनाशके

कॉपर हायड्रॉक्साईड ग्रुप M 1 I स्पर्शजन्य

व्यापारी नांव कोसाईड १०१
वर्गिकरण इनऑरगॅनिक्स
रासायनिक गट इनऑरगॅनिक्स
एफ आर ए सी (FRAC) कोड M 1
बुरशीमध्ये प्रतिकारक क्षमता निर्माण होण्याचा धोका  कमी, बुरशींमध्ये प्रतिकारक क्षमता निर्माण झाल्याची नोंद नाही.
एम ओ ए (MOA) कोड मल्टीसाईट एक्टिव्हीटी असलेले बुरशीनाशक
कार्य प्रकार स्पर्शजन्य बुरशीनाशक व जीवाणू नाशक, अल्गी नाशक.

कशासाठी उपयुक्त

पिक रोगाचे नांव व्यापारी उत्पादनाचे प्रमाण प्रती ली.
चहा ब्लिस्टर ब्लाईट २ ग्रॅम
मिरची अन्थ्रॅक्नोज २.२५ ग्रॅम
सर्कोस्पोरा लिफ स्पॉट २.२५ ग्रॅम
भुईमुग टिक्का २.७५ ग्रॅम
भात फाल्स स्मट २.७५ ग्रॅम

कार्यपद्धती

मल्टीसाईट क्रिया असलेले बुरशीनाशक, जे बुरशीच्या पेशीतील विविध ठिकाणी जावुन कार्य करते. बुरशीच्या पेशीतील इमिडाझोल, फॉस्फेटस्, सल्फायड्रल्स, हायड्रॉक्साईडस् वै.  पदार्थ जे प्रोटिन्स चा घटक आहेत, यासोबत संयोग पावते. बुरशीच्या पेशीतील प्रोटिन्स निर्मितीत बाधा आणते.

पर्यावरण व दक्षता

कॉपर सल्फेट, कॉपर ऑक्सिक्लोराईड पिकांस जास्त प्रमाणत वापरल्यास हानीकारक असते. कॉपर सल्फेट जमिनीच्या वरिल थरात सेंद्रिय पदार्थांसोबत एकत्र साचुन राहते, मात्र पाण्यात विद्राव्य असल्याने वाहुन देखिल जावु शकते.  पिक होमिओस्टॅटिक यंत्रणेद्वारा कॉपर चे पिकांतील प्रमाण नियंत्रित करते, मात्र प्रकाश संश्लेषण क्रियेतील ईलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट क्रिया बाधीत केल्यामुळे कॉपर ची विषबाधा जाणवते.