logo

बुरशीनाशके

क्लोरोथॅलोनिल ७५% WPग्रुप M 5 I स्पर्शजन्य

व्यापारी नांव कवच
वर्गिकरण क्लोरोनायट्रील
रासायनिक गट क्लोरोनायट्रील
एफ आर ए सी (FRAC) कोड M 5
बुरशीमध्ये प्रतिकारक क्षमता निर्माण होण्याचा धोका कमी, बुरशींमध्ये प्रतिकारक क्षमता निर्माण झाल्याची नोंद नाही.
एम ओ ए (MOA) कोड मल्टीसाईट एक्टिव्हीटी असलेले बुरशीनाशक
कार्य प्रकार  स्पर्शजन्य बुरशीनाशक

कशासाठी उपयुक्त

पिक रोगाचे नांव व्यापारी उत्पादनाचे प्रमाण प्रती ली.
भुईमुग टिक्का १ ते १.५ ग्रॅम
रस्ट (तांबेरा) १ ते १.५ ग्रॅम
बटाटा अर्ली आणि लेट ब्लाईट १ ते १.५ ग्रॅम
सफरचंद स्कॅब २ ग्रॅम
द्राक्ष अन्थ्रक्नोज २ ग्रॅम
डाऊनी मिल्ड्यु २ ग्रॅम
मिरची फळ कुज १ ते १.५ ग्रॅम

कार्यपद्धती

क्लोरोथॅलोनिल हे एक बहुविध बुऱशीनाशक असुन त्यांस स्पर्शजन्य आणि संरक्षणात्मक क्रिया आहे. क्लोरोथॅलोनिक बुरशीनाशकांस जास्त दिवसांचा अवशेष ( रासायनिक अवशेष हा या ठिकाणी अभिप्रेत नाही) कालावधी असल्याने, पानांवर फवारले असता, बुरशी आणि पानांमध्ये संरक्षणात्मक भिंत म्हणुन कार्य करते. बुरशीच्या पेशींत अनेक ठिकाणी कार्य करते, आणि बुरशीच्या पेशीतींल अनेक एन्झाईम्स ची निर्मिती थांबवते, तसेच बुरशीच्या पेशीतींल चयापचयाची क्रिया थांबवते. क्लोरोथॅलोनिल हे बुरशीच्या स्पोअर्स(बीजाणू) चे रुजणे थांबवते. तसेच बुरशीच्या पेशींच्या पेशीभित्तिकेस हानीकारक ठरते.

पर्यावरण व दक्षता

डोळ्यांना अत्यंत हानीकारक, डोळे पुर्णपणे झाकले जातील असा चष्मा वापरुन फवारणी करावी. स्पर्शजन्य बुरशीनाशक असल्याने फवारणीनंतर येणा-या नविन फुटींस संरक्षण देत नाही. तसेच मुळांद्वार देखिल शोषुन घेतले जात नाही. क्लोरोथॅलोनिल चे जमिनीतील अर्ध आयुष्य हे १ ते ३ महिन्यांचे आहे. आणि ते सुर्यप्रकाशाने विघटन पावत नाही. मल्टीसाईट क्रिया असल्यामुळे कमी प्रमाणात प्रतिकारक शक्ती निर्माण होते. मधमाशांना हानीकारक नाही.