logo

बुरशीनाशके

बेनोमिलग्रुप १ I आंतर प्रवाही

व्यापारी नांव बेनोमिल, बेनलेट
वर्गिकरण मिथिल बेन्झीमिडॅझोल कार्बामेटस् (MBC)
रासायनिक गट  बेन्झीमिडॅझोल
एफ आर ए सी (FRAC) कोड ग्रुप १
बुरशीमध्ये प्रतिकारक क्षमता निर्माण होण्याचा धोका जास्त
एम ओ ए (MOA) कोड बी १, मायटॉसीस मधिल बीटा ट्युबिलीन असेंब्ली वर क्रिया करते.
कार्य प्रकार आंतर प्रवाही

कशासाठी उपयुक्त

पिक रोगाचे नांव व्यापारी उत्पादनाचे प्रमाण प्रती ली.
गहु लुझ स्मट १ ग्रॅम प्रती कि. बीयाणे -बीजप्रक्रिये साठी
भुईमुग टिक्का

०.३ ग्रॅम

तंबाखु फ्रॉग आय स्पॉट

०.४ ग्रॅम

द्राक्ष भुरी ०.२५ – ०.५ ग्रॅम
अन्थ्रॅक्नोझ ०.२५ -०.५ ग्रॅम
Beans भुरी ०.३ ग्रॅम
अन्थ्रॅक्नोझ ०.३ ग्रॅम
काकडी भुरी ०.३ ग्रॅम
अन्थ्रॅक्नोझ ०.३ ग्रॅम
मिरची भुरी ०.३ ग्रॅम
फळ कुज ०.३ ग्रॅम
पानांवरिल ठिपके ०.३ ग्रॅम
वांगी भुरी ०.३ ग्रॅम
शुगर बीट पानांवरिल ठिपके ०.३ ग्रॅम
वटाणा भुरी ०.३ ग्रॅम

कार्यपद्धती

आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे. बुरशीच्या स्पोअर्स (बीजाणू) नां मारण्याची क्षमता. बुरशीची शारीरीक वाढ थांबवते.

बुरशीच्या पेशीतील डिएनए निर्मिती थांबवते. पेशी विभाजन क्रिया बंद पाडते.

पर्यावरण व दक्षता

बेनोमिल च्या प्रती रोगग्रस्त भागावरिल काही बुरशी ह्या प्रतिकारक असु शकतात. जर वापरुन नियंत्रण झाले नाही, तर पुन्हा वापर करु नये. तसेच या गटातील कार्बेन्डाझिम, थायबेन्डाझोल, थायोफिनेट मिथाईल या बुरशीनाशकांचा देखिल वापर करु नये. असे केल्याने बुरशीच्या मध्ये जास्त प्रमाणात प्रतिकारक क्षमता निर्माण होणे थांबवले जाईल.

पुर्ण अथवा अर्ध संरक्षित शेती (पॉली हाऊस, ग्रीन हाऊस) यामध्ये वापर वर्जित आहे. विद्राव्य खत प्रामुख्याने बोरॉन सोबत एकत्र करुन वापर करित असतांना खत विरघळवण्या अगोदर पाण्यात बेनोमिल विरघळवुन घ्यावे, त्यानंतर विद्राव्य खत प्रामुख्याने बोरॉन विरघळावे.

फवारणी करित असतांना हातावर, डोळ्यांवर, त्वचेवर उडणार नाही याची काळजी घ्यावी.