logo

बुरशीनाशके

अझोक्सिस्ट्रोबीन २३% एस सी ग्रुप ११ I आंतर प्रवाही

व्यापारी नांव अमिस्टार
वर्गिकरण क्विनोन आउटसाईड इनहिबीटर्स (QoI) गटातील बुरशीनाशक. स्ट्रोब्युलिन्स या लाकुड कुजवणा-या मशरुम मधिल बुरशीनाशक गुणधर्म असलेल्या घटकांपासुन निर्मित अथवा प्रेरित घटक.
रासायनिक गट मिथॉक्सी अक्रॅलेटस्
एफ आर ए सी (FRAC) कोड ग्रुप ११
बुरशीमध्ये प्रतिकारक क्षमता निर्माण होण्याचा धोका जास्त

एम ओ ए (MOA) कोड

सी ३ कॉप्लेक्स III

कार्य प्रकार आंतर प्रवाही

कशासाठी उपयुक्त

पिक रोगाचे नांव उत्पादनाचे
प्रमाण प्रती लि. पाणी
द्राक्ष डाऊनी मिल्डयु १ मिली
पावडरी मिल्डयु १ मिली
मिरची फळकुज १ मिली
पावडरी मिल्ड्यु १ मिली
आंबा अन्थ्रॅकन्कोज १ मिली
पावडरी मिल्ड्यु १ मिली
टोमॅटो अर्ली आणि लेट ब्लाईट १ मिली
बटाटा लेट ब्लाईट १ मिली

कार्यपद्धती

अझॉक्सिस्ट्रॉबिन हे बहुविध बुरशीनाशक असुन त्यास प्रतिबंधकात्मक, उपचारात्मक तसेच विनाशक आणि आंतरप्रवाही गुणधर्म आहेत.
पिकाच्या मुळांद्वारा देखिल शोषुन घेतले जाते. याचा प्रवास हा मुळांकडुन रसवाहीन्यांद्वारे खोडा कडे आणि पानांकडे होतो.
पानांवर फवारणी केल्यास पानांच्या वाढणा-या कडांकडे तसेच टोकाकडे होतो.
अझॉक्सिस्ट्रॉबिन हे बुरशीच्या पेशींतील मायटोकॉन्ड्रियल श्वसन बंद पाडते. ज्यामुळे बुरशीतील अन्ननिर्मिती (उर्जा) क्रिया बंद पडुन तीचा मृत्यु होतो.
अझॉक्सिस्ट्रॉबिन स्पोअर जर्मिनेशन (बीजाणू रुजणे), मायसेलियल वाढ (बुरशीची शारीरीक वाढ) , आणि बुरशीद्वारा स्पोअर्स ची निर्मिती (पुर्नुत्पादन क्रिया) थांबवते.
कमी प्रमाणात वापरुन देखिल अनेक बुरशींच्या विरुद्ध परिणाम कारक आहे.

पर्यावरण व दक्षता

अझॉक्सिस्ट्रॉबिन चे फवारणीचे द्रावण सतत ढवळते राहील याची काळजी घ्यावी.
अझॉक्सिस्ट्रॉबिन ५ ,७ आणि ९ पीएच ला २५ डिग्री से. तापमानात स्थिर आहे.
इरिगेशन सिस्टिम द्वारा वापर करु नये.
अझॉक्सिस्ट्रॉबिन चे जमिनीतील अर्ध आयुष्य हे १ ते ४ आठवडे इतके आहे.
अझॉक्सिस्ट्रॉबिन जमिनीत वाहुन जाण्यात सक्षम आहे, त्यामुळे जमिनीतील पाण्याच्या स्रोतांचे प्रदुषण होवु शकते.
अझॉक्सिस्ट्रॉबिन मधमाशा, गांडुळ, पक्षी आणि उपयुक्त किटकांस हानीकारक नाही मात्र फवारणी केलेल्या क्षेत्रातील पाला जनावरांस देवु नये.
एफआरएसी नुसार ग्रुप ११ गटातील बुरशीनाशक आहे. रोगांच्या बुरशीमध्ये या बुरशीनाशकाच्या प्रती प्रतिकारक शक्ती निर्माण होण्याचा धोका जास्त आहे. रोगग्रस्त भागावरिल एकुण बुरशीच्या संख्ये पैकि काहीं बुरशी ह्या बुरशीनाशकांस प्रतिकारक असु शकतात, अशा वेळेस अझॉक्सिस्ट्रॉबिन वापरुन नियंत्रण न झाल्यास किंवा अशा वेळेस पुर्ण नियंत्रण होणे याची शक्यता कमी असते, त्यामुळे पुन्हा अझॉक्सिस्ट्रॉबिन चा वापर करु नये तसेच या गटतील इतर कोणत्याही (क्यु.ओ.आय. – क्विनोन आऊटसाईड इनहिबीटर्स) बुरशीनाशकाचा वापर करु नये. इतर क्यु.ओ.आय. – क्विनोन आऊटसाईड इनहिबीटर्स बुरशीनाशके – पायरॅक्सोस्ट्रोबीन, पायरॅक्लोस्ट्रोबीन, क्रेसोक्झोम मिथाईल, फेमॅक्सोडोन, फिनॅमिडोन. असे केल्याने बुरशीच्या मध्ये जास्त प्रमाणात प्रतिकारक क्षमता निर्माण होणे थांबवले जाईल.