logo

ब्लॅक सॉईल (काळी माती)

बासाल्ट दगडा पासुन, लावा पासुन तयार झालेली हलक्या काळ्या ते गर्द काळ्या रंगाची जमिन जी भारतात जवळपास ३२ मिलीयन हेक्टर वर पसरलेली आहे. प्रामुख्याने महाराष्ट्र, मध्य प्रदेश, दक्षिण ओरीसा, दक्षिण आणि किनारपट्टीय आंध्र प्रदेश (राज्य विभाजनापुर्वी आता तेलंगाणा), उत्तर कर्नाटक, काही तमिलनाडुच्या काही भागात ह्या प्रकारची जमिन दिसुन यते.

माती जरी डोळ्यांना जवळपास एक सारखी दिसत असली तरी देखिल तिच्यात सॅण्ड, स्लिट आणि क्ले असे कण असतात. सॅण्ड म्हणजे सरळ भाषांतर करुन येणारी वाळु नसुन या कणांचा आकार हा ०.१ ते २ मिमी इतका असतो.

या जमिनीत क्ले (०.००२ मिमी पेक्षा कमी आकाराचे कण) यांचे प्रमाण हे ३० ते ४० टक्के असते. यैकी बहुतांश या मॉन्टेमोरलाईट या 2:1 क्ले असतात.

या जमिनीत पालाश चे प्रमाण जास्त असते, अनेक दिवस असे समजले जात होते कि, मातीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण हे भरपुर असते, मात्र सध्याच यावर अधिक संशोधन होवुन त्यात सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण हे कमी असते असे आढळुन आलेले आहे.

या जमिनीत चुना (लाईम), लोह, मॅग्नेशियम, जास्त असते. या जमिनीतील कॅल्शियम कार्बोनेट चे प्रमाण देखिल जास्त असते. पालाश स्थिरीकरणाचे प्रमाण जास्त असते.

या जमिनीचे वैशिष्ट असते ते जमिन कोरडी असतांना तीला भरपुर प्रमाणात आणि खोल वर पर्यंत तडे जातात, पाणी मिळाल्यानंतर हे तडे नाहीसे होवुन जमिन फुलते.

भरपुर पाणी धरुन ठेवण्याची क्षमता असलेली हि जमिन ब्लॅक कॉटन सॉईल म्हणुन देखिल ओळखली जाते.

या मातीची कॅटायन एक्सचेंज कॅपेसिटी ही ४७ ते ६५ meq/100g इतकी असते.

या पैकी कॅल्शियम ५२ ते ८५ टक्के, मॅग्नेशियम १० ते ३० टक्के तर सोडीयम हे २० टक्के व त्या पेक्षा कमी जागा व्यापुन असते.

जमिनीतील कॅल्शियम कार्बोनेट चे प्रमाण हे १० टक्क्यांपेक्षा जास्त असते.

जमिनीचा पीएच हा ७.५ ते ८.५ च्या दरम्यान असतो.

या जमिनीत कापुस, सुर्यफुल, सोयाबीन, कडधान्ये, तृणधान्ये हि पिके घेतली जातात.

ज्या प्रमाणे अँलिव्हुयल सॉईल या नदीच्या पाणलोट क्षेत्रात तयार झालेल्या आहेत, त्यांना नैसर्गिक रित्या पाणी धरुन ठेवण्याची कमी क्षमता आहे, आणि प्रामुख्याने उष्ण ते सम शितोष्ण आणि नदी क्षेत्रापासुन दुर तयार झालेल्या आणि प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर शेती केली जाणा-या काळ्या जमिनी ह्या भरपुर प्रमाणात पाणी धरुन ठेवण्याची क्षमता बाळगतात.