गायीचे शेण आणि त्यापासुन निर्मित विविध प्रकारच्या स्लरी
बाजारात मिळणारी विविध प्रकारची जैविक उत्पादने यांचा देखिल त्यात मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. शेतीसाठी उपयोगी ठरणारी विविध सुक्ष्मजीव आणि बुरशीयुक्त उत्पादानांचाच ह्या ठिकाणी जैविक उत्पादने म्हणुन उल्लेख केला जात आहे हे लक्षात घ्यावे.
अनेक शेतकरी, दुकानदार तसेच कंपनी प्रतिनिधी ह्युमिक अँसिड, सी विड, अँमिनो अँसिड, नीम तेल, करंज तेल, तेलापासुन निर्मित किटकनाशकांना, ज्यापासुन रेसिड्यु शिल्लक राहत नाही अशा उत्पादनांना आणि ज्यात काही रसायन नाही त्यांना देखिल सरसकट जैविक उत्पादने म्हणुन ओळखतात. वास्तविक पाहता हि उत्पादने नैसर्गिक स्रोतांपासुन निर्मित असल्या कारणाने त्यांना नैसर्गिक उत्पादने म्हणुनच उल्लेखले जायला हवे आहे. ज्या उत्पादनात सुप्तावस्थेत किंवा जिवंत अवस्थेत सुक्ष्मजीव अथवा बुरशी असतात त्यांनाच काय ते जैविक उत्पादने म्हणायला हवे.
जीवाणूंच्या प्रार्थमिक अभ्यासतुन, गायीचे शेण अँनारोबिक पध्दतीने कुजवत ठेवलेले असतांना त्यात ९ प्रकारचे जीवाणू जास्त प्रमाणात दिसन आलेत. ह्यातील १ जीवाणू हा अँरोबिक जीवाणू होता, १ फॅकलटेटिव्ह अँरोबिक होत तर उर्वरित ७ जीवाणू हे अँनारोबिक जीवाणू होते. आपण आधीच फरमेंटेशन पध्दतीत अँनारोबिक परिस्थिती तयार होत असल्या कारणाने त्यात अरोबिक जीवाणू वाढण्यात अडचणी येतात हा मुद्दा मांडलेला आहेच त्याच यातुन शास्रिय बळ मिळते आहे.
शेणकाला, स्लरी, रबडी अशा अनेक नावांनी फरमेंटेशन केलेल्या शेणाच्या, गोमुत्राच्या मिश्रणाचा वापर अनेक शेतकरी, विशेष करुन डाळिंब उत्पादक शेतकरी करतात. ह्यात बाजारात मिळाणारी जैविक उत्पादने घातली जातात, तसेच ह्यात दुध, ताक, दही, डाळीचे पिठ, वडाच्या, कडुलिंबाच्या झाडाच्या जवळची माती देखिल काही ठिकाणी घातली जाते. फरमेंटशन म्हणजे ४ ते १५ दिवस पाण्यात हे सर्व किंवा ह्यातील काही ठराविक पदार्थ घालुन ते कुजत ठेवले जातात. काही शेतकरी हे मिश्रण दररोज ढवळतात, तर काही ठिकाणी ते ढवळले देखिल जात नाही.
ह्या स्लरी मध्ये नेमके काय असते, त्यात असलेल्या सुक्ष्मजीवांची खरोखर वाढ होते का, आणि ते दिल्यानंतर पिकास तरतरी कशामुळे येते हे आणि असेच अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. या ठिकाणी ह्याच प्रश्नांची उकल आपण करणार आहोत.
ज्या पध्दतीने स्लरी ह्या प्रयोगाचा प्रसार झाला, तितक्या वेगात कुठल्याही भारतिय पारंपारीक पध्दतीचा प्रसार आणि वापर हा झालेला नाही. ह्या स्लरी ची अनेक रुपे आपणास बघायला मिळातात. त्यात प्रत्येक ठिकाणी सोयीनुसार, सल्लागार सांगेल त्यानुसार, किंवा अनुभवानुसार प्रत्येक घटकाचे प्रमाण हे कमी जास्त होत असते, तर काही ठिकाणी काही घटक हे अजिबातच वापरले जात नाहीत.
ज्या वेळेस शेण, गोमुत्र, दही, ताक, तुप, डाळीचे पिठ, माती यांचे मिश्रण अनेक ठिकाणी सुक्ष्मजीवांसाठी तपासले गेले त्यावेळेस त्यास अँस्परगिलस स्पे. अँक्टिनोमायसिटस, ई. कोलाय ह्यांचीच मात्रा हि सर्वाधिक प्रमाणात दिसुन आली. स्लरी च्या फरमेंटेशन च्या सुरवातीच्या काळात सुक्ष्मजीवांची संख्या वेगात वाढते, मात्र नंतर ती कमी होत जावुन काही ठिकाणी पुर्णपणे थांबते.
ज्या सुक्ष्मजीवांची मात्रा सर्वाधिक प्रमाणात आढळुन येते त्यातील अँस्परगिलस स्पे. आणि ई. कोलाय हे हानीकारक सुक्ष्मजीव आहेत. ज्यांच्या मुळे पिकात तसेच मानवांत देखिल रोग होतात. असे असतांना देखिल स्लरीच्या वापरातुन पिकाच्या वाढीवर होणा-या सकारात्मक परिणामांनी अनेकांना स्लरीच्या वापराबाबतीत प्रेरित केले आहे.
फरमेंटेशन ह्या प्रक्रियेत, पाणी आणि अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेत सुक्ष्मजीव वाढवले जातात, किंवा जे पदार्थ फरमेंटशन क्रियेत टाकले आहेत त्यांच्या पासुन नविन पदार्थ मिळवला जातो. जीवाणूंची प्रयोगशाळेत करण्यात येणारी वाढ हि काही जीवाणूंसाठी फरमेंटेशन तंत्राचा वापर करुन केली जाते, तर द्राक्षापासुन तयार होणारी वाईन हि देखिल फरमेंटेशन पध्दतीने केली जाते. दही तयार करणे, काही समाजात धान्य, फळे यांचे पासुन वाईन तयार करण्याची फरमेंटेशन हि पध्दत मानवी संस्कृती ईतकिच जुनी आहे. अनेक वेळेस ह्या तंत्रज्ञानाचा वापर आपण नकळत देखिल करत असतो, जसे दही तयार करणे, बायोगॅस प्लांट वै.
फरमेंटेशन पध्दतीचा थोडा जाणिवपुर्वक अभ्यास केल्यास आपणास दिसुन येते की, ही पध्दत जर अनियंत्रित परिस्थितीत केली तर ती पुर्णपणे अँनारोबिक म्हणजेच ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत होत असते. प्रयोग शाळेत जेव्हा जीवाणूंची वाढ केली जाते त्यावेळेस त्यात निंयंत्रित प्रमाणात सतत ऑक्सिजनचा (म्हणजेच हवेचा) पुरवठा केला जात असतो, त्यामुळे ह्या पध्दतीत अँरोबिक जीवाणू देखिल वाढवता येतात.
आपण ह्या आधी अँरोबिक, अँनारोबिक, फॅकलटेटिव्ह अँरोबिक अशा जीवाणूंचा अभ्यास केलेला आहेच. त्यामुळे ह्या संज्ञा व्यवस्थित जाणुन घेतल्या नंतर चाणाक्ष वाचकांच्या मनात हा प्रश्न नक्कीच उपस्थित झाला असेल की, जर स्लरी तयार होण्याची प्रक्रिया ही अँनारोबिक परिस्थितीत होत असते तर त्यात अँरोबिक जीवाणू आणि बुरशी कशा वाढतील. ज्या शेतक-यांनी, तंत्रज्ञांना असे प्रश्न पडलेत त्यांनी काही विशिष्ट प्रकारचे ड्रम विकसित केलेत. त्या ड्रम मध्ये जीवाणू वाढविण्यासाठी एका क्रॉप्रेसर व्दारे हवेचा सतत पुरवठा होत राहील ही काळजी घेतली गेली. सध्या अशा ड्रम चा देखिल मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे.
काही वेगळ्या पध्दतीचे ड्रम मला छत्तिसगढ येथे बघावयास मिळालेत, ज्यात एकाच ड्रम मध्ये काही कप्पे केले गेले होते. एका कप्प्यात शेण आणि त्यासोबत एकत्र केलेल्या मिश्रणात जीवाणू वाढवले जातात. त्यातील निथळ द्रावण हे दुस-या कप्प्यात नेले जाते, आणि ते त्यांनतर शेतात सोडले जाते.
एक मुद्दा ह्या ठिकाणी स्पष्ट पणे अधोरेखित कऱण्यासारखा आहे, की येथुन पुढे होणारी चर्चा आणि आता पर्यंत झालेली चर्चा ही, स्लरी मध्ये जीवाणू किंवा बुरशी वाढविणे ह्याच विषयावर झालेली आहे, आणि होणार आहे. यात स्लरीचा वापर करणे चुकिचे आहे असा संबंध कुठेही लावु नये. या माहीतीतुन अधिक परिणामकारक स्लरी तयार करण्यात नक्कीच मदत होणार आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या विविध उत्पादनांच्या आणि स्लरीच्या एकत्र वापरातुन (एकत्र कुजवुन बाजारातील उत्पादनांतील सुक्ष्मजीवांची संख्या वाढविणे असा एकत्र वापर करणे याचा अर्थ कृपया काढु नये. दोन्ही परस्परभिन्न क्रिया आहेत.) अधिक चांगल्या प्रकारे परिणाम मिळतील यात संशय नाही.
ज्या स्लरीत शेण,गोमुत्र, दही, ताक, डाळीचे पिठ, गुळ, नारळाचे पाणी हे सर्व किंवा ह्या पैकि काही घटक यांचा वापर करुन त्यात बाहेरुन जीवाणू टाकुन त्यांची संख्या वाढविण्याचा प्रयत्न केला जातो, त्या स्लरी च्या जैविक परिक्षाणानंतर अनेकांना त्यात अँस्पिरगिलस स्पे., अँक्टिनोमायसिटस, आणि ई.कोलाय ह्यांची संख्या अधिक प्रमाणात दिसुन आलेली आहे हे आपण आधी बघितलेच आहे. हे परिक्षण करतांना सुक्ष्मजीव वाढविणे (Multiplication) ह्या पारंपारीक पध्दतीचा अवलंब केला गेला.
ह्या पध्दतीत काही तृटी आहेत, आणि वेळखाऊ देखिल आहे. यातील काही निष्कर्ष हे शेतक-यांनी स्वयंप्रेरणेने केलेल्या परिक्षणातुन आढळुन आलेत तर काही ठिकाणी शास्रज्ञांनी केलेल्या परिक्षणातुन देखिल दिसुन आलेत. ह्या ठिकाणी अँस्पिरगिलस स्पे., अँक्टिनोमायसिटस, आणि ई. कोलाय ह्याची संख्या जास्त प्रमाणात असली तरी देखिल ईतर देखिल काही उपयुक्त अथवा निष्पक्ष सुक्ष्मजीव देखिल दिसुन आले आहेत. जगभरात ह्या बाबतीत जे संशोधन झालेले आहे त्यांच्या बाबातीत अधिक जाणुन घेतल्यास आपणास स्पष्टता येईल.
मल्टिप्लिकेशन पध्दतीतील तृटी दुर करुन काही शास्रज्ञांनी 16s rRNA ह्या आधुनिक आणि तंत्रशुध्द पध्दतीचा अवलंब करुन जे प्रयोग केलेत तेच ह्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत ह्याची नोंद घ्यावी.
त्रिचुनगोन्डे, तमिलनाडु येथिल स्थानिक गायींच्या शेणात 1:2 ह्या प्रमाणात पाणी टाकुन, (१ भाग ताजे शेण आणि २ भाग पाणी) ह्या मिश्रणास २० लि. च्या प्लास्टिक च्या ड्रम मध्ये वाढविले गेले(थोडक्यात फरमेंटेशन, ह्या क्रियेत बायोगॅस तयार होतो) . ह्या ड्रम मध्ये ईतर कोणतेही पदार्थ टाकले गेले नाहीत. ह्या मिश्रणातील सुक्ष्मजीवांचा अभ्सास करण्यासाठी १० व्या, २० व्या आणि ३० व्या दिवशी सॅम्पल काढले गेले.
ह्या परिक्षणासाठी 16s rRNA ह्या पध्दतीचा अवलंब करुन, प्रयोगात आढळुन आलेल्या प्रत्येक सुक्ष्मजीवाची त्याच्या जीन कोड नुसार पक्कि ओळख पटवली गेली असल्या कारणाने ह्यात संशयाला कोणताही वाव राहत नाही.
जीवाणूंच्या प्रार्थमिक अभ्यासतुन, गायीचे शेण अँनारोबिक पध्दतीने कुजवत ठेवलेले असतांना त्यात ९ प्रकारचे जीवाणू जास्त प्रमाणात दिसन आलेत. ह्यातील १ जीवाणू हा अँरोबिक जीवाणू होता, १ फॅकलटेटिव्ह अँरोबिक होत तर उर्वरित ७ जीवाणू हे अँनारोबिक जीवाणू होते. आपण आधीच फरमेंटेशन पध्दतीत अँनारोबिक परिस्थिती तयार होत असल्या कारणाने त्यात अरोबिक जीवाणू वाढण्यात अडचणी येतात हा मुद्दा मांडलेला आहेच त्याच यातुन शास्रिय बळ मिळते आहे.