logo

अँसिड सॉईल

अँसिड सॉईल

चुनखडी म्हणजे लाईमस्टोन, कॅलसाईट, अरागोनाईट व व्हॅटेराईट ज्यात क्रिस्टल स्वरुपातील कॅल्शियम कार्बोनेट, या लाईम स्टोन मधे सिलिकॉन, मॅग्नेशियम, फेरस,अँल्युमिनियम यांचे कार्बोनेट, ऑक्साईड, व हायड्रॉक्साईड असे क्षार असतात. जसे कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम ऑक्साईड, व कॅल्शियम हायड्रॉक्साईड त्याच प्रमाणे मॅग्नेशियम कार्बोनेट, मॅग्नेशियम ऑक्साईड, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड इ.

कॅलसाईट, अरोगनाईट, व व्हॅटेराईट या मिनरल्स चे ज्यावेळेस विघटन होते त्यावेळेस त्यातुन कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम ऑक्साईड व कॅल्शियम हायड्रॉक्साईड मुक्त होतात.

ज्या जमिनीत चुनखडी असते तीला आपण सरळ सरळ चुनखडी युक्त माती म्हणतो. चुनखडी मध्ये किती प्रमाणात मुक्त चुना आहे हे तपासणे गरजेचे आहे. लाईम स्टोन म्हणजे दगड स्वरुपातील चुना, आणि लाईम म्हणजे चुना.

चुना म्हणजे असा घटक ज्यात कॅल्शियम हायड्रॉक्साईड Ca(OH)₂ आणि कॅल्शियम ऑक्साईड CaO यांचे प्रमाण जास्त असते.

या पैकी कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजे बांधकामाचा चुना देखिल होतो. तर कॅल्शियम ऑक्साईड यांस क्विक लाईम म्हणुन देखिल ओळखतात.

या तिनही कॅल्शियम च्या स्वरुपांची पाण्यात विद्राव्यता तपासली तर ती खालिल प्रमाणे येते.

जमिनीचा प्रकार कॅल्शियम चे क्षार पाण्यात विद्राव्यता सामु वर परिणाम
चुनखडी मधिल चुना कॅल्शियम हायड्रॉक्साईड Ca(OH)₂  0.173g/1lit 20°C वाढत्या तापमानात कमी कमी होत जाते. वाढणार
  कॅल्शियम ऑक्साईड 1.19 g/1lit 20°C वाढत्या तापमानात कमी कमी होत जाते. वाढणार
कॅलकॅरियस माती (Calcarious Soil) कॅल्शियम कार्बोनेट
CaCO₃
0.013g/1lit 25°C स्थिर राहतो

चुनखडी असलेली माती हि मुक्त चुना पिकास देण्यास जास्त सक्षम असते हे वरिल तुलनात्मक तक्त्यावरुन लक्षात येईल. अशा जमिनीत मातीचा सामु हा फार जास्त असा असतो. लाईम चा वापर हा अँसेडिक सामु असलेल्या जमिनीत मातीचा सामु वाढविण्यासाठी केला जातो.

चुनखडी असलेली जमिन हि पाण्यात विद्राव्य असे क्षार असल्या कारणाने चांगल्या दर्जाच्या पाण्याच्या वापराने तसेच त्यात सेंद्रिय पदार्थांच्या वापराने सुधारता येतात.

चुनखडी असलेली व त्यातील मुक्त चुन्याचे प्रमाण जास्त असलेली जमिन पिकांस कॅल्शियमचा अतिरिक्त पुरवठा कऱण्यास सक्षम ठरते.

चुनखडी असलेल्या जमिनीत पाणी मुरण्याची समस्या जाणवत नाही.

चुनखडी युक्त जमिन आणि कॅलकॅरियस सॉईल या दोघांमधे फरक आहे. आणि या दोन्ही जमिनींच्या व्यवस्थापनात देखिल फरक आहे. आपणा कडे अगदी चुनखडी चे दगड असणारी माती असु शकते जी कॅलकॅरियस सॉईल पेक्षा पुर्णतः वेगळी अशी ठरते.

अशा चुनखडी युक्त जमिनीत गांडुळ खत, हिरवळीचे खत, शेणखत, आणि चांगले पाणी ज्यात क्षार कमी आहेत त्याचा वापर केला असता अशा जमिनी कॅलकॅरियस होण्यापासुन वाचु शकतात. भरपुर पाणी जमिनीवरुन वाहुन जाईल आणि जमिनीत देखिल वाहुन जाईल अशी उपाययोजना फायदेशिर ठरेल.

ज्या जमिनीत १५ टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात कॅल्शियम कार्बोनेट चे प्रमाण असते ती जमिन कॅलकॅरियस सॉईल म्हणुन ओळखली जाते. या जमिनीत योग्य रितीने पाणी व्यवस्थापन केल्यास या जमिनीतुन चांगले उत्पादन मिळते. कॅल्शियम कार्बोनेट हे जमिन कडक करण्याचे कार्य करते, कारण कॅल्शियम कार्बोनेट पाण्यात फार कमी प्रमाणात विरघळते व ज्यामुळे जमिनीच्या त्या थरात घट्ट जमा होते जेथे त्याचे प्रमाण हे जास्त असते.

अशा जमिनीचा सामु हा सहसा ८.५ च्या वर जात नाही. कॅल्शियम कार्बोनेट जमिनीतील पाण्यात फार कमी प्रमाणात विरघळते ज्यामुळे, मातीचा सामु हा जवळपास स्थिर राहण्यास मदत मिळते.

कॅल्शियम कार्बोनेट जमिनीत कशा प्रकारे रासायनिक अभिक्रिया करते ते खालि दिलेले आहे.

H₂O + CaCO₃ = CO₂ + Ca(OH)₂

वरिल अभिक्रियेत कॅल्शियम कार्बोनेट पाण्यात विरघळल्यानंतर त्यापासुन कार्बन डाय ऑक्साईड आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार झालेत. हे दोन्ही पाण्यासोबत पुन्हा अभिक्रिया होवुन हायड्रोजन आयन्स मुक्त करतात जेणे करुन मातीचा सामु कमी होतो.

H₂O + CaCO₃ = CaO + H₂CO₃

वरिल अभिक्रियेत कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बोनिक अँसिड तयार होते. या पैकी कार्बोनिक अँसिड हे एक अशक्त असे अँसिड असल्याने त्यापासुन मातीचा सामु जरी कमी झाला तरी तो कमी प्रमाणात होतो.

H₂O + CaCO₃ = Ca(OH)₂ + H₂CO₃

वरिल अभिक्रियेत कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि कार्बोनिक अँसिड तयार होते. यामुळे देखिल सामु कमी होतो.

मात्र या क्रिया होण्यासाठी जितक्या प्रमाणात कॅल्शियम कार्बोनेट पाण्यात विरघळायला हवे तेवढे विरघळत नाही, आणि त्यामुळेच अशा जमिनींचा सामु हा जवळपास ८.५ वर स्थिर असतो. जर अशा जमिनीत सोडीयम चे प्रमाण वाढले तर मात्र सामु वाढतो आणि जमिन कालांतराने सोडीक जमिन म्हणुन तयार होते जी सुधारण्यास जवळपास अशक्य आणि अत्यंत खर्चिक व कठिण आहे. त्यामुळे अशा जमिनीत पाण्याचा वापर करतांना त्यात सोडियम कमी असेल किंवा अजिबात नसेल असेच वापरावे.

अशा जमिनीत युरिया, अमोनियम सल्फेट हि खते रोप उगवणीनंतर, लागवडीनंतर रोप स्थिर झाल्यानंतर जमिनीत गाडुन करावा.

अशा जमिनीत स्फुरद ची मात्रा नैसर्गिक रित्या कमी असते. शिवाय सामु देखिल ८.५ च्या जवळपास असाच असतो त्यामुळे अशा जमिनीत विद्राव्य स्वरुपातील स्फुरद चा वापर फायदेशिर ठरतो, मात्र असे स्फुरद युक्त खत पिकांस वेळेचे वेळी द्यावे, एकाच वेळेस देवु नये. इतर खतांचा वापर करतांना त्यातील स्फुरद हे सावकाश विरघळणारे असे असेल तर ते लागवडीपुर्वी किंवा रोप उगवणीनंतर जमिनीत गाडुन द्यावे.

अशा मातीची कॅटायन एक्सचेंज कॅपेसिटी देखिल कमी असते, मात्र या कॅपेसिटी मधिल ८० टक्क्यांपेक्षा जास्त जागा ही कॅल्शियम ने व्यापलेली असते. ज्यामुळे जमिनीत कॅल्शियम, मॅग्नेशियम व पोटॅश चे गुणोत्तर बिघडते.

कॅल्शियम व पोटॅश हे पिकात शिरण्यासाठी स्पर्धा करित असल्याने या जमिनीत पालाश खतांची मात्रा हि इतर जमिनींपेक्षा जास्त प्रमाणात लागते.

या जमिनीत झिंक, फेरस, कॉपर, यांची देखिल कमतरता जाणवते, त्यामुळे अशा जमिनीत सुक्ष्म अन्नद्रव्ये हि चिलेटेड स्वरुपात पिकाच्या गरजेनुसार द्यावीत.

सल्फर च्या वापराने मातीचा सामु कमी होण्यास मदत होते मात्र त्यासाठी जमिनीत सल्फर खत म्हणुन न वापरता ते लागवडीच्या आधी २० ते ५० किलो तरी वापरावे, वास्तविक त्याचे प्रमाण हे केवळ ०.५ ने सामु कमी करण्यासाठी हे ८०० किलो प्रती एकर इतके जास्त आहे, इतके वापरणे हे शक्य नाही आणि व्यवहार्य देखिल नाही त्यामुळे २० ते ५० किलो प्रती एकर सल्फर लागवडी च्या किमान २ ते ५ महिने आधी वापरुन त्यासोबत सल्फर ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया वापरावेत. असे सतत ७-८ वर्ष केल्यानंतर जमिनीचा सामु काहीप्रमाणात सुधारण्यास मदत होईल.

ॅलकॅरियस जमिनीतील पाणी धरुन ठेवण्याची व पाणी वाहुन जाण्याची क्षमता वाढवणे, कॅटायन एक्सचेंज कॅपेसिटी वाढवणे, तसेच जमिनीतील पालाश चे प्रमाण वाढवणे यासाठी जमिनीत सेंद्रिय पदार्थांचा वापर जास्त करावा. जमिनीत मांस युक्त सेंद्रिय खते जास्त टाकावीत, तसेच हिरवळीच्या खतांचा वापर जास्त करावा.