logo

टोमॅटो (Lycopersicon esculentum)

लागवडीचा हंगाम

लागवड रोप तयार करुन केली जाते.

लागवडीचा हंगाम – जुन-जुलै, सप्टेंबर – ऑक्टोबर, जानेवारी –फेब्रुवारी

जमिन आणि हवामान

उबदार वातावरण मानवणारे पिक आहे. सामु 6 ते 7 मानवतो.

बियाणे आणि लागवडीचे अंतर

160 ते 200 ग्रॅम बियाणे प्रती एकर

लागवडीचे अंतर 60 X 60 सें.मी, 75 X 75 सें.मी., 90 X 90 सें.मी.

खतांचे प्रमाण

10 ते 12 मे.टन कुजलेले शेणखत प्रती एकर क्षेत्रात लागवडीपुर्वी पसरवुन, गाडुन टाकावे.

40 किलो नत्र, 20 किलो स्फुरद, व 20 किलो पालाश प्रती एकर

सरासरी उत्पादन

80 ते 120 क्विंटल प्रती एकर ( 20 किलोचे 400 ते 600 कॅरेटस्)

पिकाचा कालावधी व वाण

125 ते 130 दिवसांचे पिक

वाण – पुसा रुबी, पुसा अर्ली डार्फ, मार्ग्लोब, बेस्ट ऑफ ऑल, राणा, एस-12, पंजाब छुआरा, वैशाली, शितल, अभिनव, अनुप वै.

लागवडीचे वेळापत्रक रोपनिर्मिती 

एक हेक्‍टर क्षेत्रासाठी तीन गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका करावी. संकरित वाणांसाठी 125 ग्रॅम बियाणे हेक्‍टर क्षेत्रासाठी पुरेसे असते. बीजप्रक्रियेसाठी थायरम तीन ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा 5.0 ग्रॅम प्रति किलो आणि त्यानंतर ऍझोटोबॅक्‍टर 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे. त्यामुळे मर, रोपे कोलमडणे, कॉलर कूज हे रोग नियंत्रणात राहतात. रोपे उगवल्यावर नायलॉनच्या जाळीने ती झाकून घ्यावीत. यामुळे किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. रोपवाटिकेत वेगवेगळ्या रोगांचे व किडींचे वेळीच नियंत्रण करावे. 

ट्रे पद्धत

ट्रे पद्धतीने रोपे तयार करावयाची असल्यास 98 कप्पे असलेला प्रो- ट्रे वापरावा. एक ट्रे भरण्यासाठी किमान 1.25 किलो कोकोपीट लागते. कोकोपीटने भरलेल्या ट्रेमध्ये एका कप्प्यात एक बी याप्रमाणे बी पेरावे.

या पद्धतीत बियाणे वाया जात नाही, तसेच  प्रत्येक रोपाची सशक्त वाढ होते. 90 सें.मी. अंतरावर सऱ्या पाडून जमिनीच्या उतारानुसार वाफे बांधून घ्यावेत. लावण करते वेळी दोन  रोपांतील अंतर 30 सें.मी. ठेवावे. 3.60 3.00 मी. आकारमानाचे वाफे तयार करावेत. रोपांची लागवड लागवडीपूर्वी रोपे शिफारशीत 
कीडनाशकांच्या द्रावणात बुडवून घ्यावीत. 

पाणी व्यवस्थापन 

 • जमिनीचा मगदूर व हवामान या गोष्टी विचारात घ्याव्यात.
 • हलक्‍या जमिनीत पाण्याच्या पाळ्या जास्त द्याव्यात. भारी जमिनीत पाण्याच्या पाळ्या कमी द्याव्यात.
 • पिकाच्या सुरवातीच्या काळात पाणी जास्त झाल्यास पानांची व फांद्यांची वाढ जास्त होते. म्हणून फुलोरा येईपर्यंत लागवडीपासून अंदाजे 65 दिवसांपर्यंत पाणी बेताने द्यावे. 
 • ठिबक संचामधून पाणी देताना दैनंदिन पाण्याची गरज निश्‍चित करून तेवढे पाणी मोजून द्यावे. 
 • फुले लागण्याच्या काळात पाण्याचा ताण पडल्यास फुले व फळे गळणे, फळधारणा न होणे या समस्या निर्माण होतात.

पाणी सतत आणि जास्त दिल्यास मुळांना हवेचा पुरवठा होत नाही. झाडाची पाने पिवळी पडतात व उत्पादनात घट येते.

फूलगळ

टोमॅटो पिकाची फूलगळ प्रामुख्याने जास्त तापमान, मंद प्रकाश, वेगवान व कोरडे वारे, पाण्याचा ताण, रोग व किडींचा प्रादुर्भाव, 
पिकांमधील वाढसंप्रेरकांत होणारा बदल आदी कारणांमुळे होते.

पॉलिमल्चिंग आणि प्रो ट्रे तंत्रज्ञान

एका बंडलमध्ये 400 मीटर लांबीचा कागद बाजारात उपलब्ध असून वरील बाजूस चंदेरी व खालील बाजूस काळा रंग असलेला किंवा दोन्ही बाजूंस काळा रंग असलेला कागद वापरणे फायदेशीर दिसून आले. पाच फूट अंतरावर गादी वाफे काढल्यास एकरी सहा बंडल लागतात. त्यासाठी सुमारे 12 हजार रुपये खर्च येतो. केंद्राने विविध रंगांच्या पॉलिथिन पेपरच्या वापराचे प्रयोग केले. त्यात निळा-निळा, तांबडा-तांबडा, काळा-काळा या रंगांच्या पेपरमध्ये काळा-काळा व चंदेरी-काळा रंगांचे पेपर वापरणे फायदेशीर दिसून आले.

निष्कर्ष

 • प्रात्यक्षिक पिकात ए ग्रेड फळांचे उत्पादन तुल्य पिकापेक्षा 22.50 टक्‍क्‍यांनी वाढले.
 • बी व सी ग्रेड फळांचे उत्पादन तुल्य पिकापेक्षा अनुक्रमे 12.30 व 9.56 टक्‍क्‍यांनी कमी झाले. केवळ मल्चिंग पद्धत वापरल्यामुळे.
 • अनुक्रमे 1,03,029 रु. व 6,4023 रु. निव्वळ नफा झाला.

रोपनिर्मितीसाठी प्रो ट्रे

प्रो ट्रे किंवा सीडलिंग ट्रे विशिष्ट प्रकारच्या प्लॅस्टिकपासून बनवितात. सर्वसाधारणपणे 104 कप असलेला व कपाची खोली चार ते पाच सें.मी. असलेला प्रो ट्रे वापरावा. गुणवत्तेनुसार पाच रुपयांपासून 12 रुपयांपर्यंत त्यांची किंमत आहे. एक प्रो ट्रे भरण्यासाठी सर्वसाधारणपणे एक किलो कोकोपिटची आवश्‍यकता असते. एक भाग कोकोपिट व एक भाग गांडूळ खत किंवा चांगले कुजलेले कंपोस्ट खत मिसळून घ्यावे. तयार झालेले माध्यम निर्जंतुक करून घ्यावे. हे माध्यम प्रो ट्रेमध्ये भरण्यापूर्वी ओले करून घ्यावे व प्रो ट्रेमध्ये दाब देऊन भरावे. कपाच्या तोंडाशी थोडी जागा रिकामी ठेवावी व एक सें.मी. खोलीवर प्रत्येक कपात एक बी या प्रमाणे बी लावावे व कोकोपिट मिश्रणाने प्रो ट्रे पूर्णपणे भरून घ्यावा. बी लावलेले प्रो ट्रे एकावर एक दहा याप्रमाणे रचून गोणपाटाने झाकून ठेवावे. तीन दिवसांत बी उगवल्यानंतर प्रो ट्रे मोकळ्या जागेत सूर्यप्रकाशात पसरून ठेवावेत व झारीच्या साहाय्याने हलकेच पाणी द्यावे.

प्रो ट्रे वापराचे फायदे

 • प्रो ट्रेत वाढविलेली रोपे लावणीयोग्य होण्यासाठी 18 ते 21 दिवस लागतात,तर गादीवाफ्यावर वाढविलेल्या रोपांना हेच 26 ते 30 दिवस लागतात.
 • प्रो ट्रेमधील रोपांमध्ये 94 ते 97 टक्के उगवण मिळते. अशा रोपांच्या लावणीनंतर दोन ते पाच टक्के एवढे नांगे पडतात. गादी वाफ्यावरील रोपांची उगवणक्षमता 55 ते 60 टक्के मिळते आणि लावणीनंतर 12 ते 15 टक्के नांगे पडतात.
 • लावणीनंतर प्रो ट्रेमधील रोपांची वाढ जलद होते. त्यामुळे तीन तोडे गादीवाफ्यावरील रोपांपेक्षा जास्त मिळतात. याचा फायदा उत्पादनवाढीसाठी होतो.
 • प्रो ट्रेमधील रोपांची वाढ एक समान होऊन मुळ्यांमधील वाढ जास्त मिळते. यामुळे अशी रोपे पॉलिथिन मल्चिंगवर लागवडकरण्यासाठी अतिशय योग्य असतात.

मल्चिंग पेपर वापरण्याचे फायदे

 • टोमॅटो पिकातील तणांचे नियंत्रण.
 • मजुरांची मोठ्या प्रमाणात बचत.
 • पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन पाण्याची बचत.
 • पाण्यात विरघळणारी खते वाफ होऊन उडून जात नाहीत. परिणामी खतांची बचत जास्तीची थंडी किंवा उष्ण तापमान यापासून संरक्षण.
 • मातीचे तापमान नियंत्रित राहते. परिणामी, अन्नद्रव्यांचे विशेषतः थंडीमध्ये चांगले शोषण. मातीचे योग्य तापमान राखल्यामुळे जिवाणूंची चांगली वाढ.
 • अतिवृष्टीपासून उंच गादीवाफ्याचे, परिणामी पिकांचे चांगले संरक्षण टोमॅटोच्या फळांचा मातीशी संपर्क न आल्यामुळे फळांची प्रत सुधारते.
 • रोग व किडींचे चांगले नियंत्रण.