logo

header-ad
header-ad

सोयाबिन तण व्यवस्थापन | Soyabean Weed Management

शेतातील नेहमी येणा-या तणांचा अभ्यास करुन, रोप उगवणीपुर्वी वापरण्यायोग्य तणनाशके वापरुन, सुरवातीच्या काळातील तण नियंत्रण मिळवुन घ्यावे. कोरडवाहु परिसरातील शेतकरी, हे पुर्णतः पावसाच्या लहरीपणावर अवलंबुन असतात, एखाद्या वेळेस पेरणीनंतर पाउस लागुन राहील्यास बरेच दिवस शेतात तणनियंत्रण मिळत नाही, आणि पिकांच्या वाढीवर याचे दुष्परिणाम होतात. उगवणीपुर्वी वापरण्यासाठी पेन्डीमेथिलिन (टाटा पनिडा वै. नावांनी उपलब्ध आहे) हे एक चांगले तणनाशक आहे. हे तणनाशक पेरणीच्या १४० दिवस आधी तसेच पेरणीच्या ७ ते १० दिवस आधी देखिल वापरता येते. वापरानंतर हे तणनाशक जमिनीत २ ते ३ इंच खोल अंतरावर चांगले एकत्र करुन टाकावे. पेंडीमेथिलिन, सारखेच ट्रायफ्लुरॅलिन हे तणनाशक देखिल पेरणीपुर्वी वापरता येते.

सोयाबीन पिकांत वापरता येणारी तणनाशके, हि तणनाशके वापरतांना कंपनी प्रतिनाधी, कृषी तज्ञ, किंवा दुकानदार यांचा सल्ला घेवुन, रोपांवर फवारणी होणार नाही याची काळजी घेवुन वापरावे.

तणनाशक केव्हा वापरावे
पॅराक्वेट आणि पेंडीमेथिलिन लागवडीनंतर २ दिवसांच्या आत वापारवे.
पॅराक्वेट आणि ब्युटॅक्लोर लागवडीनंतर २ दिवसांत वापरावे.
फुसिलेड फोर्टी लागवडीनंतर २१ ते २८ दिवसांनी वापरावे.
तण उगवणीनंतर वापरण्याचे तणनाशक -
टरगा बहुवार्षिक तणांच्या नियंत्रणासाठी दोन वेळेस वापारवे लागु शकते.
परस्युट (इमिझाथायपर) तण उगवणीनंतर वापरता येते. तणाच्या वाढीचा काळ सक्रिय हवा.