सोयाबीन पिकावरिल हा एक प्रमुख रोग आहे. पानांवर फिक्कट लालसर ते गर्द लालसर रंगाचे पट्टे पडतात, अशा पट्ट्यांच्या पानांखालिल बाजुवर लालसर रंगाची पावडर जमा होते. ज्यावेळेस भरपुर प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव झालेला असतो त्यावेळेस, असे पान पांढ-या कागदावर झटकल्यास कागदावर लालसर, पांढरी पावडर जमा झालेली दिसुन येते.या रोगामुळे सोयाबीन पिकाचे ८० टक्यांपर्यंत नुकसान होणे शक्य आहे.

