ज्या वेळेस शेतात ७ ते १४ दिवस भरपुर पाणी साचुन राहते, किंवा भरपुर पाऊस लागुन राहतो त्यावेळेस हा रोग दिसुन येतो. रोप पिवळसर पडुन मरुन जाते. काही वेळेस रोग ग्रस्त रोप जगते मात्र त्यापासुन हवे तसे उत्पादन मिळत नाही. रोग ग्रस्त रोपाचे खोड जमिनीपासुन वर तांबुस रंगाचे होते. मेलेली पाने रोपांस चिकटुन राहतात. फायटोप्थोरा बुरशीमुळे हा रोग होतो.