logo

header-ad
header-ad

सोयाबिन अन्नद्रव्य व्यवस्थापन -(प्रमाण किलो प्रती एकर)

सोयाबीन पिकाच्या मुळांवरती रोयझोबियम हा उपयुक्त जीवाणू राहत असल्याने या पिकांस वरुन नत्र खताची फारशी गरज भासत नाही.

सोयाबीनच्या मुळांवरील गाठी निट तयार होण्यासाठी पेरणी सोबत किंवा रोप उगवल्यानंतर लागलीच १० किलो फेरस सल्फेट १ एकरात जमिनीतुन द्यावे.

या शिवाय सोयाबीन पिकांस खालिल प्रमाणे अ्नद्रव्ये द्यावीत.

लागवडीनंतर दिवस नत्र स्फुरद पालाश मॅग्नेशियम सल्फेट कॅल्शियम नायट्रेट सल्फर झिंक सल्फेट फेरस सल्फेट मँगनिज सल्फेट
५-१० दिवस १० २५ २५ ०० ०० ०० ०० १० ००
३०-३५ दिवस ०० ०० ०० १० ०० ०० १० ००
एकुण १० २५ २५ १० ०० ०० १० ००

सोयाबीन पिकांत शेंगा पोसत असतांना सल्फर (गंधक) युक्त खतांचा वापर करावा. मात्र या कतातुन पिकांस उपलब्ध होईल अशा स्वरुपात गंधक मिळविण्यासाठी सल्फर ऑक्झिडाझिंग बॅक्टेरियाचा वापर करणे गरजेचे आहे. या काळात पिकांस बोरॉन आणि पालाश ची गरज फवारणीतुन पुर्ण करावी.

पिकाच्या वाढीची अवस्था फवारणीच्या खतांचा प्रकार प्रमाण प्रती लिटर पाणी
लागवडीनंतर १० - १५ दिवसांत 19-19-19 2.5 -3 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये 2.5-3ग्रॅम
वरिल फवारणीनंतर १५ दिवसांनी २० टक्के बोरॉन 1 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये 2.5-3 ग्रॅम
फुलोरा अवस्थेत 00-52-34 4-5 ग्रॅम
मायक्रोन्युट्रीएंटस् (ग्रेड नं २) 2.5-3 ग्रॅम
शेंगा पासत असतांना 00-52-34 4-5 ग्रॅम
बोरॉन 1 ग्रॅम
वरिल फवारणीनंतर ७ दिवसांनी 00-52-34 4-5 ग्रॅम