logo

header-ad
header-ad

सोयाबिन लागवड पध्दती | Soyabean Plantation

सोयाबीन ची लागवड करतांना तापमान आणि सुर्यप्रकाश किती तास राहील याचा विचार करावा. सोयाबीन हे शॉर्ट डे (म्हणजेच दिवसांत कमी तास सुर्यप्रकाश राहणे) पिक आहे. सोयाबीन ला जसा जसा दिवसांतील सुर्यप्रकाशाचा कालावधी कमी कमी होत जाईल तसे तसे फुल धारणा होत असते. सोयाबीनची लागवड ४.५ ते ८.५ च्या पीएच (सामु) असलेल्या जमिनीत केली तरी चालते. ज्या जमिनीत जास्त प्रमाणात पाणी साचुन राहत असेल त्या जमिनीत सोयबीन ची लागवड करु नये.

लागवडीपुर्वी बीज प्रक्रिया

  • सोयाबीन च्या लागवडी पुर्वी रायझोबियम आणि सल्फर ऑक्सिडायझिंग बॅक्टेरीया ची बीज प्रक्रिया करावी.
  • सोयाबीन पिकाच्या मुळांवरती रायझोबियम ही सहजीवी नत्र स्थिर करणारा बॅक्टेरिया (जीवाणू) गाठी करुन राहत असतो.
  • हा बॅक्टेरिया हवेतील मुक्त स्वरुपातील नत्र, सोयाबीन पिकांस उपल्बध होईल अशा स्वरुपात रुपांतरीत करीत असतो.
  • रायझोबियम च्या वापराने सोयबीन ची चांगली वाढ होते. फांद्यांची संख्या वाढते, तसेच जास्त प्रमाणात प्रोटिन्स तयार होवुन दाण्यांचे वजन देखिल वाढते.
  • सोयाबीन पिकापासुन २० टक्के इतके तेल मिळते. सोयाबीनच्या दाण्यांत २० टक्के तेल तयार होण्यात सल्फर (गंधक) हे अन्नद्रव्य फार महत्वाची भुमिका बजावित असते.

लागवड

सोयाबीन ची लागवड जुन ते जुलै महिन्यात केली जाते.

लागवड करतांना पावसाचा अंदाज घेवुन लागवड करावी. पेरणीनंतर जास्त काळ राहणारा कोरडा काळ सोयाबीन पिकासाठी हानीकारक ठरतो. अशा कोरड्या काळामध्ये रोपांची मर होण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मान्सुन व्यवस्थित स्थिर झाल्यानंतरच पेरणी करावी.

  • सोयाबीन ची पेरणी करतांना १ एकरात १,७७,७७७ रोप बसतील अशा पद्धतीने पेरणी करावी.
  • पेरणीतील अंतर हे दोन ओळीत ७५ से.मी. आणि दोन रोपांत १० .सें.मी. राहील असे करावे. एका ठिकाणी २ किंवा ३ बिया टोचता येतात.
  • पेरणी करतांना जमिनीत फार खोलवर पेरणी करु नये, त्यामुळे सोयाबीन ची वाढ हवी तशी मिळत नाही.
  • १ एकरात पेरणीसाठी ३० ते ४० किलो बियाणे पुरेसे होते.