logo

डाळिंब रोपांची निगा

दर १५ दिवसांनी एक वेळा दहा ग्रॅम युरीया, दहा ग्रॅम सिंगल सुपर फॅस्फेट, दहा ग्रॅम म्युरेट आँफ पोटॅश प्रति झाडाला द्यावे, दर तीन महिन्यातून एकदा पाच किलो कंपोस्ट खत + ट्रायकोडर्मा + जिवाणू खते + अर्धा किलो निंबोळी पेंड प्रति झाड टाकावे. दर सहा महिन्यांतून एकदा सूक्ष्म अन्नद्रव्य व दुय्यम अन्नद्रव्यांचा डोस प्रति झाड २५ ग्रॅम इतका द्यावा.

रोपे लावल्यानंतर पहिल्या पावसाळ्यात बागेत हिरवळीचे खत (धैंचा, सन) पेरावे व ते फुलो-यावर येण्याआधी झाडाच्या मुळी क्षेत्रात गाडावे.

बागेत वाढणारे तण बाहेर फेकू नये, असे तण मुळी क्षेत्रात तयार होणा-या गादीवाफ्यांवर सतत टाकावे, यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब सुधारतो. जमिन आच्छादली गेल्यामुळे पांढरी मुळी, जिवाणू व गांडुळांची वाढ जलद गतीने होते, मात्र पावसाळ्यात आच्छादन करू नये.

बहर:

डाळींब पिकाला योग्य नियाजन केल्यास वर्षभरात केव्हाही बहर धरतो, म्हणुन त्याला सदाबहार पीक म्हटले जाते. तरीही मुख्यतः तीन बहारात डाळींबाचे नियोजन करतो येते. १) मृग बहर, २) हस्त बहर, ३) आंबे बहर.

मृग बहरः पावसाळा सुरू झाल्यानंतर जो बहर धरला जातो, त्याला मृग बहर म्हणतात. हा मुख्यतः पावसाच्या पाण्यावर पोसला जातो. मृग बहर हा जिरायती व जिथे पाण्याची कमतरता असते तिथे मोठ्या प्रमाणात धरला जातो. ह्याचा कालावधी जून-जुलै किंवा पावसाच्या आगमनावर अवलंबून असतो. मृग बहरात डाळींब पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळतो, म्हणून मृग बहरात बुरशीजन्य व विषाणूजन्य रोगांचे काटेकोर नियोजन करावे.

मृग बहरः पावसाळा सुरू झाल्यानंतर जो बहर धरला जातो, त्याला मृग बहर म्हणतात. हा मुख्यतः पावसाच्या पाण्यावर पोसला जातो. मृग बहर हा जिरायती व जिथे पाण्याची कमतरता असते तिथे मोठ्या प्रमाणात धरला जातो. ह्याचा कालावधी जून-जुलै किंवा पावसाच्या आगमनावर अवलंबून असतो. मृग बहरात डाळींब पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळतो, म्हणून मृग बहरात बुरशीजन्य व विषाणूजन्य रोगांचे काटेकोर नियोजन करावे.

आंबा बहर – आंब्याबरोबर घेतल्या जाणा-या डाळींब बहराला आंबा बहर म्हणतात. हलक्या व मुरमाड जमिनीत तीनही बहर घेणे शक्य असते, कारण कमी कालावधीत अशा जमिनींना ताण बसु शकतो, परंतू ज्या जमिनी जाड व भरपूर दळ असणा-या असतात, अशा जमिनीत आंबा बहर चांगला पर्याय आहे.

झाडावर १०० टक्के पानगळ झाली तर उत्तम; पण ब-याच वेळा अशी परिस्थिती निर्माण होत नाही. काही शेतकरी झाडांवरील सर्व पाने निपसून टाकतात, पानांच्या बगलेत म्हणजेच देठाजवळ फुल निघण्याची क्षमता असते. पाने निपसल्यामुळे तेथे इजा होऊन फुल निघण्याची क्षमता नष्ट होते, तर काही शेतकरी झाडे हलवून पाने झटकण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे डाळींब झाडाची मुळी हलते व तिला हवा लागते, त्यामुळे काही प्रमाणात ताण नाहीसा होऊन झाडांना पालवी फुटते, याला झाड चिगरणे असही म्हणतात.

छाटणीआधी करावयाची कामेः

बहर धरण्याची तारीख निश्चित करणे.

त्यासाठी लागणा-या खर्चाचा तपशील तयार करणे. त्याची पूर्तता करणे.

छाटणीआधीच सेंद्रिय कंपोस्ट खते दोन महिने आधी मागविणे, कंपोस्ट खतांमध्ये खते कुजविणारे जिवाणू, स्फुरद विरघळणारे जिवाणू ट्रायकोडर्मा, ई एम द्रावण, अझोटोबॅक्टर, पोटॅश माँबिलाइझर, स्पॅसिलोमायसिस आदी टाकुन खते तयार करणे, जिवाणू खतांचे प्रमाण एका ट्रॅलीसाठी पाचशे ग्रॅम/मि.लि. इतके असावे. एकावर एक तीन थर रचुन त्यावर सतत पाणी टाकत रहावे व त्या ढीगाला गवताने किंवा तत्सम वस्तुंनी झाकुन ठेवावे. ही खते उच्च प्रतीची, पोषणमूल्य असणारी व जमिनीचा पोत सुधारणारी बनतात.

झाडाची छाटणीः

पानगळीनंतर दुसरा महत्वाचा टप्पा म्हणजे झाडांची छाटणी होय. छाटणीवर डाळींबाचा बहर अवलंबून असतो. झाडाची कोणती काडी फळ देणारी आहे, हे अनुभवाअंती आपण ओळखू शकतो. झाडाची छाटणीच केली नाही तर जाड काडीवर आपण फळे घेऊ शकत नाही. अशा बिगर छाटणीच्या झाडांवर काडीच्या टोकाकडे फुले लागतात, त्यामुळे फळांना अपेक्षित फुगवण मिळू शकत नाही.

पोट छाटणीः

डाळींब झाडाच्या आतील भागात म्हणजे पोटात फळे येण्यासाठी केलेली छाटणी म्हणजे पोट छाटणी. या छाटणीत झाडाच्या आतील भागात फळ देणा-या काड्या ठेवण्यात येतात, त्यामुळे फळ सावलीत राहतात.

पंजा छाटणीः

हाताच्या पंजासदृश्य दिसणा-या छाटणीस पंजा छाटणी म्हणतात. या छाटणीत झाडाच्या पोटातील म्हणजे आतील फांद्यांचे जाळे काढून झाड पोकळ करण्यात येते, त्यामुळे प्रत्येक फांदीला मुबलक सुर्यप्रकाश मिळतो.