logo

सल्फर | Sulphur

जमिनीतील सेंद्रिय पदार्थ हे सल्फर चा नैसर्गिक स्रोत म्हणुन पिकासाठी कार्य करित असतात.

हा सल्फर ब-याच वेळेस इलिमेंटल सल्फर (S) च्या स्वरुपात असल्या कारणाने तो पिकास उपलब्ध अशा स्वरुपात नसतो. पिक सल्फर हा सल्फेट (SO₄⁻⁻) च्या स्वरुपात शोषुन घेत असल्याने जमिनतील सेंद्रिय पदार्थातील तसेच बाजारातुन विकत आणलेल्या इलिमेंटल सल्फर चे रुपांतर सल्फेट मधे होणे गरजेचे आहे.

पिकासाठी इलिमेंटल आणि सेंद्रिय स्वरुपातील सल्फर चे रुपांतर सल्फेट मधे करण्याचे कार्य थायोबॅसिलस स्पे. जीवाणू करतात.

सल्फर जमिनीचा सामु कमी करण्यासाठी देखिल उपयुक्त ठरते. मातीचा सामु केवळ 0.5 ने जरी कमी करावयाचा असेल तर क्ले जास्त असलेल्या मातीत 800 किलो इलिमेंटल सल्फर लागेल. या हिशेबाने जर 1 एकर क्षेत्रातील केवळ 40 टक्के जमिन हि मुळांनी व्यापलेली असेल आणि त्यातील केवळ 50 टक्के भागात बाजारातील 1 किलो सल्फर पोहचत असेल तर त्या तेवढ्या क्षेत्रासाठी 0.5 ने सामु कमी करण्यासाठी 160 किलो सल्फर लागेल. हा एक केवळ अंदाज आहे, कि एक एकर क्षेत्रातील मुळांच्या परिसरातील सामु कमी करण्यासाठी किती सल्फर लागेल.

बरेच जण अस सांगतात की सल्फर पाण्यात टाकला कि सल्फ्युरिक अँसिड तयार होते ज्यामुळे मातीचा सामु कमी होतो, पण हे असे होणे शक्य नाही, कारण सल्फर ने मातीचा सामु कमी होणे हि सर्वस्वी जैविक प्रक्रिया असुन ती थायोबॅसिलस स्पे. मुळे शक्य होते. जीवाणू सल्फर वर प्रक्रिया करुन त्याचे रुपांतर सल्फेट मधे करतात. हि प्रक्रिया संथ रित्या होते. जर अशा वेळेस जमिनीत योग्य असा पाण्याच्या पुरवठा नसेल तर हि क्रिया मंदावते.

अमोनियम सल्फेट, फेरस सल्फेट यांच्या वापराने देखिल मातीचा सामु कमी करता येतो. कारण त्यात सरळ सरळ सल्फेट असते. सल्फेट जमिनतील हायड्रोजन सोबत संयोग पावुन मातीचा सामु कमी करु शकते.

इलिमेटंल सल्फर (सल्फर ऑक्सिडेशन कऱणारे जीवाणू ह्या ईलिमेंटल सल्फर वर प्रक्रीया करुन त्यानंतरच), फेरस सल्फेट, वै सल्फर असलेली उत्पादने हि जमिनीत सल्फ्युरिक अँसिड तयार करतात, (H₂SO₄) हे सल्फ्युरिक असिड मग पाण्यात विरघळुन हायड्रोजन आणि सल्फेट चे आयन्स वेगवेगळे होतात, आणि त्यामुळे हायड्रोजन आयन्स चे प्रमाण वाढुन सामु कमी होतो. ज्यात सल्फेट आहे ते सरळ सरळ रासायनिक अभिक्रिया होवुन सल्फ्युरिक अँसिड तयार करतात तर ज्यात इलिमेंटल सल्फर आहे ते जैविक प्रक्रियेने सल्फ्युरिक अँसिड तयार करतात.

जमिनीत सल्फेट हे सहज रित्या वाहुन जाणारे आणि पिकास सहज रित्या उपलब्ध होईल असे द्रव्य आहे, त्यामुळे सामु कमी करण्यात याची भुमिका फार जास्त राहत नाही, जर ते सल्फेट युक्त खतांतुन पिकास दिले गेले असेल तर. मात्र इलिमेंटल सल्फर हे जास्त काळ जमिनीत राहते आणि शिवाय जीवाणूंव्दारा प्रक्रिया होत नाही तोवर त्यापासुन ना पिकास खत मिळते ना जमिनचा सामु कमी होतो, त्यामुळे दिर्घकालिन परिणामांसाठी आणि सावकाश परिणामांसाठी इलिमेंटल सल्फर जास्त परिणामकारक ठरते.

आपण आता पर्यंत जमिनीचा सामु यास अनुसरुन सर्वच गोष्टी करत आहोत, मात्र पिकाच्या मुळांच्या परिसरातील सामु हा त्यापासुन लांब असलेल्या मातीच्या सामु पेक्षा कमी असतो. पिकाच्या मुळांच्या परिसरातील मातीत ऑक्सिजन चे प्रमाण हे कार्बन डाय ऑक्साईड पेक्षा कमी असते, तर पिक जमिनीत हायड्रोजन आयन्स देखिल स्रवत असते, ज्यामुळे त्या परिसरातील सामू हा कमी असतो.

सामु कमी करणे आणि तो करण्यासाठी बाहेरुन काहीतरी वापरणे, हा विषय जसा क्लिष्ट आहे तसाच तो व्यवहार्य देखिल नाही.

सल्फर सामु कमी करण्याच्या व्यतिरिक्त देखिल पिकासाठी फार महत्वाची भुमिका पार पाडत असते.

सल्फर हे प्रथिनांच्या निर्मितीसाठी गरजेचे आहे तसेत ते काही अँमिनो अँसिड चा घटक असते.

नत्राचे रुपातंर प्रथिनांत होण्यासाठी गरजेचे आहे

हरितलवक निर्मितीत ते उत्तेजक म्हणुन कार्य करते. पिकांती खराब झालेल्या पेशींच्या दुरुस्ती साठी गरजेचे आहे. ज्या पिकांच्या मुळांवर उपयुक्त गाठी तयार होतात त्यांच्या निर्मितीसाठी गरजेचे आहे.

ज्यावेळेस पिकांस वरिल फायद्यांसाठी सल्फर द्यावयाचे आहे त्यावेळेस ते सल्फेट स्वरुपात देणे फायदेशिर ठरते. शिवाय ज्यावेळेस तात्काळ परिणाम हवा असेल त्यावेळेस देखिल सल्फेट स्वरुपातील खतांचा वापर हा फायदेशिर ठरतो.

ज्या खतांतुन पिकांस मोफत सल्फेट मिळते ती पुढील प्रमाणे

खताचे नांव सल्फर (%)
अमोनियम सल्फेट 24%
अमोनियम थायोसल्फेट 26%
कॅल्शियम सल्फेट 15-17%
फेरस सल्फेट 12%
पोटॅशियम सल्फेट (एस.ओ.पी.) 22%
पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट 22%
सल्फर 90%
सल्फ्युरिक अँसिड 32%

अनेक सल्लागार स्लफ्युरिक अँसिड चा वापर सुचवतात, मात्र याचा सामु कमी होण्यावर होणारा परिणाम हा फार अल्प असाच राहील, कारण 90% सल्फर असलेले इलिमेंटल सल्फर जर 800 किलो लागते तर 32% असलेले कीती लागेल याचा विचार केलेलाच बरा. जरी यातुन सरळ सरळ हायड्रोजन आयन्स मिळणार असतिल तरी.

सल्फर हे तेलबिया पिके, कडधान्ये यासाठी जास्त गरजेचे असते.

सल्फर पाण्यात विरघळत नाही. पाण्यात विरघळत नसल्या कारणाने सल्फर चे अती सुक्ष्म कणांच्या व्दारा ते पाण्यात तरंगत राहतील अशी व्यवस्था केली जाते, अशा प्रकारे अती सुक्ष्म कण पाण्यात तरंगत राहील्याने सल्फर पाण्यात विरघळलेले आहे अशी भावना निर्माण होवु शकते. सल्फर चे जितके सुक्ष्म कण तितके ते अन्नद्रव्य म्हणुन जास्त उपयोगी ठरतात.

सल्फर पिकात वहनशिल नसल्याने त्याची कमतरता हि नविन पानांवर दिसुन येते. यात पानांचा रंग पिवळसर होतो. फुलांचा आकार लहान राहतो.