logo

मॉलेब्डेनियम | Molybdenum

पिकाव्दारे शोषुन घेतलेल्या नायट्रेट चे रुपांतर अँमिनो अँसिड मधे होण्यासाठी मॉलेब्डेनियम ची गरज भासते. ज्या पिकांच्या मुळांवर नत्र स्थिर करणा-या जीवाणूंच्या गाठी तयार होतात त्या पिकात नत्र स्थिरीकरणासाठी गरजेचे आहे.

पिकाव्दारे शोषुन घेतलेल्या स्फुरद चे रुपांतर पिकात सेंद्रिय स्फुरद मधे करण्यासाठी गरजेचे आहे.

मॉलेब्डेनिमय हा एक ऋणभार असणारा आयन असल्या कारणाने जमिनीत वाहुन जाण्याचे प्रमाण जास्त असते.

सुक्ष्म अन्नद्रव्यातील मॉलिब्डेनियम हे एकमेव असे मुलद्रव्य आहे जे जास्त सामु असतांना उपलब्ध होते आणि कमी सामु असतांना त्याची उपलब्धता कमी होते.

सल्फर च्या वापराने मॉलिब्डेनियम ची उपलब्धता कमी होते.

स्फुरद च्या उपस्थितीत मॉलिब्डेनियम ची उपलब्धता वाढते.

ज्या जमिनीत अमोनियम स्वरुपातील नत्र युक्त खतांचा वापर केला जातो तेथे युरिया खताच्या वापराच्या तुलनेत मॉलेब्डेनियम कमी जरी असला तरी पिक नियमित वाढ दर्शवते, यावरुन लक्षात येते कि युरिया खतातील नत्राच्या (नायट्रेट) वापरसाठी मॉलिब्डेनियम महत्वाचे आहे.

कोबी पिकातील फुलाचा विचित्र असा आकार ही मॉलिब्डेनियम ची कमतरता आहे. पानांच्या कडा पिवळसर होतात. कलिंगड, भोपळा वर्गिय पिकात मॉलिब्डेनियम ची गरज जास्त असते. वेलवर्गिय पिकात मॉलिब्डेनियम ची कमतरता असेल तर पिकाची टोका कडील आणि त्या आधीची पाने नत्र कमतरता असल्या प्रमाणे पिवळी पडतात.

मॉलेब्डेनियम कमतरतेमुळे फुलातील एंब्रियो (गर्भ) हा व्यवस्थित तयार होत नाही, तर पुकेंसरांची फर्टिलिटी देखिल कमी होते, ज्यामुळे फळधारणेवर विपरित परिणाम होतो.

>>