logo

मँगनीज (मंगल) | Manganese

प्रकाश संश्लेषण क्रियेत कार्बन डायऑक्साईड चा वापर होण्यासाठी मँगनीज ची गरज भासते. मँगनीज हे नायट्रेट च्या वापरात देखिल कार्य करते.

हरितलवक निर्मितीमधे गरजेचे असते. पिकामधे मेद (फॅट) तयार करण्याच्या प्रक्रियेस मँगनीज उत्तेजना देते.

पिकात रायबोफ्लॅवीन, अस्कॉर्बीक अँसिड आणि कॅरोटेन (व्हीटामीन बी, सी, व ए) च्या निर्मितीसाठी गरजेचे आहे.

प्रकाश संश्लेषण क्रियेत पाण्याचे विघटन होवुन त्यापासुन हायड्रोजन व ऑक्सिजन वेगळा होतो त्या हिल्स रिअँक्शन मधे गरजेचे आहे.

जास्त सामु असलेल्या जमिनीत मँगनीज ची कमतरता निर्माण होते. इतर सुक्ष्म अन्नद्रव्यांप्रमाणे मँगनीज देखिल सेंद्रिय पदार्थांव्दारा चिलेट केले जाते ज्यामुळे पिकांस उपलब्धता वाढते.

ज्या जमिनीत जास्त प्रमाणात फेरस आहे किंवा फेरस खत दिल्यानंतर मँगनीज ची कमतरता जाणवते.

मँगनीज पिकात वहनशील नसल्या कारणाने त्याची कमतरता हि नविन पानांवर प्रथम दिसुन येते. पानांच्या शिरांमधिल भाग पिवळसर होतो. कधी कधी पानांवर तपकिरी काळसर रंगाचे चट्टे पडतात.

एक एकर क्षेत्रात जमिनीतुन देण्यासाठी मँगनीज ची शिफारस हि 450 ग्रॅम ते 2.25 किलो इतकी केली जाते.

मँगनीज जमिनीवर पसरवुन न टाकता ते जमिनीत गाडुन मुळांच्या जवळ द्यावे.

>