पिकातील हरितलवक निर्मितीसाठी गरजेचे अन्नद्रव्य आहे. मॅग्नेशियम हरितलवकाचा घटक देखिल आहे. मॅग्नेशियम पिकात प्रकाश संश्लेषण क्रियेत गरजेचे आहे.
पिकाच्या पानांनी तयार केलेले अन्नद्रव्य, ज्या ठिकाणी, म्हणजे मुळांमधे, कंदात तसेच दाण्यांमधे साठवले जाते यांच्यावर मॅग्नेशियम कमतरतेमुळे विपरित परिणाम होतो.
पिकाच्या मुळांच्या वाढीसाठी देखिल मॅग्नेशियम गरजेचे आहे.
पिक मॅग्नेशियम रुट इंटरसेप्शन (एक्टिव ट्रान्सपोर्ट) पध्दतीने शोषुन घेते. मॅग्नेशियम पिकातील फॉस्फोरसच्या वहनासाठी देखिल गरजेचे आहे.
मॅग्नेशियम पिकात साखर निर्मितीत गरजेचे आहे, तर स्टार्च च्या वहनात देखिल महत्वाचे आहे.
पिकांत फॅट (मेद) व तेल तयार होण्यात मॅग्नेशियम गरजेचे असते.
पिकातील फेरसच्या वापरासाठी मॅग्नेशियम गरजेचे आहे.
ज्या पिकांच्या मुळांवर नत्र स्थिर करणा-या गाठी तयार होतात, त्यागाठी तयार होण्यात मॅग्नेशियम मदत करते.
मातीचा कमी सामु असल्यास मॅग्नेशियम ची उपलब्धता कमी होते, तर जास्त सामु असल्यास ती वाढते.
जमिनीत जास्त प्रमाणात मँगनीज असल्यास मॅग्नेशियम ची सामू कमी झाल्याने उपलब्धता कमी होते.
ज्या जमिनीत पालाश व कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते तेथे मॅग्नेशियम ची कमतरता जाणवते.
जमिनीत पालाश आणि मॅग्नेशियम यांची पिकात शिरण्यासाठी मोठी स्पर्धा चालते, ज्यामुळे पिकास मॅग्नेशियम ची कमतरता जाणवते. मॅग्नेशियम शिफारस करित असतांना जमिनीतील पालाश ची मात्रा देखिल माहीत असणे गरजेचे आहे.
मॅग्नेशियम दिलेले असल्यास स्फुरद ची उपलब्धता वाढते, मात्र स्फुरद व मॅग्नेशियम युक्त विद्राव्य खते एकत्र दिल्यास त्यांचे स्थिरिकरण होते.
मॅग्नेशियम दिल्यानंतर सल्फर चे लिचिंग (जमिनीत वाहुन जाणे) वाढते.
मॅग्नेशियम सर्वच पिकांसाठी गरजेचे असले तरी देखिल कोबी, फुलकोबी, कापुस, काकडी, वांगी, बटाटा, पालक, तंबाखु, टोमॅटो व खरबुज पिकांस अतिरिक्त मॅग्नेशियम दिल्यास चांगला प्रतिसाद देतात.
माती परिक्षणानुसार ज्या जमिनीत मॅग्नेशियम ची मात्रा अतिशय कमी आहे तेथे 13.6 किलो मॅग्नेशियम द्यावे तर जेथे मॅग्नेशियम कमी आहे तेथे 6.8 किलो मॅग्नेशियम द्यावे.
हि मात्रा मॅग्नेशियम नायट्रेट किंवा मॅग्नेशियम सल्फेट व्दारे देतांना त्यातील मॅग्नेशियमची टक्केवारी माहीत असणे गरजेचे आहे. मॅग्नेशियम सल्फेट आणि मॅग्नेशिय नायट्रेट या दोघांत 9 टक्के इतके मॅग्नेशियम असते.
तर पोटॅशियम शिओनाईट म्हणजेच पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट मधे ते 11 टक्के इतके असते.
सन 1930 पासुन अमेरिकेतील खाणीतुन पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट काढले जाते, स्वच्छ केले जाते आणि अनेक ठिकाणी पालाश, मॅग्नेशियम तसेच सल्फर चा स्रोत म्हणुन वापरले जाते, वास्तविक या आधी आपण बघितले की, पिकात शिरण्यासाठी पालाश आणि मॅग्नेशियम यांची स्पर्धा चालते. विशेष म्हणजे हे खत पाण्यात विद्राव्य असेच आहे. हा प्रश्न अनुत्तरित आणि एक कोडं निर्माण करणारा असाच राहील, जसा सिंगल सुपर फॉस्फेट मधे 21 टक्के कॅल्शियम असते, (वास्तविक कॅल्शियम हे फॉस्फेट सोबत स्थिर होते म्हणुन आपण चिंता करत असतो.)