logo

व्हाईट रॉट

स्केलोरेशियम सिपिव्होरम (Sclerotium cepivorum) या बुरशी मुळे हा असाध्य असा रोग होतो. नियंत्रणास अत्यंत कठिण अशा या रोगाची लागण झाल्यानंतर कांदा पिकाची पाने पिवळी पडतात व गळुन जातात. रोप उपटुन बघितले असता, रोपास मुळांची संख्या अत्यंत अल्प अशी दिसुन येते. तसेच कांदाच्या कंदावर काही ठिकाणी पांढरी बुरशी वाढलेली दिसुन येते.

व्हाईट रॉट l White Rot
व्हाईट रॉट l White Rot

नियंत्रण –

नियंत्रणास अत्यंत कठिण, जवळपास नियंत्रण होत नाही. ब-याच वेळेस लक्षणे हि झिंक, फेरस किंवा नत्र कमरतेशी जोडुन बघिलती जातात त्यामुळे रोगाचे निदान केवळ पानांवरिल लक्षणांनुसार न करता रोप उपटुन लक्षणे तपासुन बघावित.

रोग ग्रस्त रोप उपटुन शेतापासुन किमान १७० फुट लांब नेवुन जाळुन नष्ट करावीत.

पुन्हा त्याच शेतात कांदा लागवड किमान ८ वर्ष करु नये. कांदा वेस्ट पासुन सेंद्रिय खत बनवु नये.

लागवड करतांना रोप लावुन लागवड करण्यापेक्षा बी वापरुन लागवड करावी.