logo

कांदा पातीस पिळ पडणे (व्टिस्टर रोग)

कांदा पिकात, खरिप हंगामात लागवड केल्या जाणा-या आणि पुढिल हंगामासाठी खरिप हंगामाच्या शेवटी, पावसाच्या काळात रोप तयार करत असतांना, कांदा पातीला पिळ पडण्याची समस्या मोठ्या प्रमाणवर जाणवते. हि समस्या प्रामुख्याने जास्त पावसाच्या काळात दिसुन येते.

पानांवरिल लक्षणे

रोगाची लक्षणे हि, रोगाची लागण झाल्यानंतर सहसा ६ दिवसांत दिसायला सुरवात होते. कांद्या पाने वास्तविक पेक्षा जास्त प्रमाणात लांब आणि बारीक होतात. कांद्याच्या पानांना पिळ पडतो, तसेच पाने पिवळी होतात. पिवळी पाने हि लक्षणे, झिंक-फेरस कमतरतेसारखी भासतात. पानांवर काही वेळेस डाग पडतात, असे डाग खोलगट असतात आणि रंग गर्द तपकिरी ते काळसर असतो. रोगाची जास्त प्रमाणात लागण झालेली असल्यास, रोपांची मर देखिल दिसुन येते.

कांद्याची मान व कंदा वरिल लक्षणे

कंद आणि त्यातुन पाने निघतांना जास्त लांब देठाची निघतात. कंद हा निमुळता अंडाकृती बनतो. कंद नरम पडतात.

मुळांवरिल लक्षणे

मुळांची वाढ खुंटते, मुळांवर गाठी दिसुन येतात. शक्यतो मुळांच्या टोकावर गाठी तयार होतात.

रोगाची कारणे

कांद्या वरिल व्टिस्टर रोग हा, प्रामुख्याने कोलेक्टोट्रिकम गॅलिओस्पोरिओडिस (विविध पिकांवर या बुरशीमुळे एथ्रॅक्नोज हा रोग होतो), तसेच काही प्रमाणत फ्युजॅरियम ऑक्सिस्पोरियम, आणि ज्या ठिकाणी मुळांवर गाठी कऱणा-या सुत्रकृमी मेलिडोगायनी स्पे. ची उपस्थिती असते त्याठिकाणी रोगग्रस्त मुळांवर आढळुन येतात. रोगाचे मुळ कारण कोलेक्टोट्रिकम गॅलिओस्पोरिओडिस हि बुरशी असली तरी देखिल काही प्रमाणात फ्युजॅरियम बुरशी देखिल आढळुन येते. केवळ कोलेक्टोट्रिकम बुरशीमुळे लागण झाल्यास रोगाची लक्षणे हि, रोगाची लागण झाल्यानंतर सहसा ६ दिवसांत दिसायला सुरवात होते. कोलेक्टोट्रिकम बुरशीमुळे रोगाची लागण झाल्यानंतर प्रथम कांद्याच्या मानेवर खोलगट पट्टे पडतात आणि ते सडतात, त्यावर बुरशीची वाढ देखिल दिसुन येते. पाने टोकाकडुन पिवळी पडुन मरतात. केवळ फ्युजॅरियम या बुरशीमुळे रोगाची लागण झाल्यास, साधारणतः १२ दिवसांत लक्षणे दिसुन येतात. पानांना जमिनीलगत पिळ पडतो, मान लांब होते. कंदावर पांढरे, गुलाबी डाग पडुन कंद सडतो.

रोग नियंत्रणाचे उपाय

रोग नियंत्रणासाठी, निरोगी बियाणे वापरावे. रोप तयार करत असतांना, ट्रायकोवीन १ ग्रॅम प्रती लि. तसेच सुमोनॅक्स १.५-२ ग्रॅम प्रती लि. या प्रमाणत, रोग उगवणीनंतर लागलीच आळवणी करावी. पुर्वी रोगाचा प्रादुर्भाव जास्त असेल, किंवा पावसाचे वातवरण असेल तर पुन्हा ७ ते १० दिवसांनी सटलेक्स १-१.५ ग्रॅम प्रती लि. व सुमोनॅक्स १.५ते २ ग्रॅम प्रती लि. पाण्यातुन आळवणी करावी. रोप पुर्नलागवडीनंतर, ट्रायकोवीन २०० ग्रॅम व सुमोनॅक्स ५०० ग्रॅम प्रती एकर या नुसार लागलीच आळवणी करावी. फवारणीतुन वापरता येण्यासारखी बुरशीनाशके – पावसाचे किंवा जास्त आद्रता युक्त वातावरण असतांना - मॅन्कोझेब,कॅपटन, कॉपर ऑक्सिक्लोराईड, प्रोपीनेब यापैकी एका बुरशीनाशकाची प्रतिबंधकात्मक म्हणुन फवारणी घ्यावी. नवीन वाढ झाल्यानंतर स्पर्शजन्य बुरशीनाशके नवीन वाढीवर प्रभावी ठरत नसल्याने, पिकाची वाढ होत असतांना फवारणी पुन्हा घ्यावी. आंतरप्रवाही बुरशीनाशकांची फवारणी घेतांना, वातावरणात जास्त आर्द्रता, किंवा पाऊस नसावा. आंतर प्रवाही बुरशीनाशकांत फॉसेटिल ए एल, मेटालॅक्झिल, सायमॉक्झिनील, कार्बेन्डाझिम यांचा वापर करता येण्यासारखा आहे.

सदरिल रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब, कॅपटन, झिनेब, प्रोपीनेब, थोयफिनेट मिथाईल, क्रेक्सोक्झेम मिथाईल, फॉसेटिल ए एल, मेटालॅक्झिल, सायमॉक्सानील, कार्बेन्डाझिम, क्लोरोथॅलिनील, इप्रीडीऑन यासारखी बुरशीनाशके फवारणीतुन वापरता येण्यासारखी आहेत.

व्टिस्टर रोग
व्टिस्टर रोग
व्टिस्टर रोग