logo

कांद्या वरिल तांबेरा (रस्ट)

कांदा पिकावरिल रस्ट किंवा तांबेरा हा रोग पक्सिनिया पुरी या बुरशीमुळे होतो. या रोगात पिकाच्या पानांवर लालसर रंगाचे उभट असे ठिपके पडतात. पान पिवळसर होते, जास्त प्रमाणात नत्रयुक्त खताचा वापर केल्यास रोगाचा प्रादुर्भाव जास्त दिसुन येतो. जास्त आद्रता आणि ओलसर वातावरण तसेच उबदार वातावरणात रोग वाढीस लागतो.

रोगाच्या नियंत्रणासाठी अक्झोस्ट्रोबीन, मॅनेब, मॅन्कोझेब, टेब्युकोनॅझोल या बुरशीनाशकांचा वापर करता येईल.