logo

पर्पल ब्लॉच (Purple Blotch)

पर्पल ब्लॉच हा रोग अल्टरनॅरिया पुरी (Alternaria porri) या बुरशीमुळे होतो. रोगाच्या सुरवातीला पानांवर खोल गेलेले पाढ-या रंगाचे ठिपके किंवा चट्टा पडतो. वातावरणातील आद्रतेमुळे हा ठिपका वाढीस लागुन त्यानंतर त्याचा रंग जांभळा होतो, अशा चट्ट्याच्या कडा या पिवळसर राहतात.

रोगाची लागण जास्त प्रमाणात झालेली असल्यास ठिपका पडला त्यापासुन वरिल भाग हा पिवळा पडुन तेवढा भाग सुकुन जातो.

या रोगाच्या वाढीसाठी आद्रता तसेच ६ ते ३४ डि.से. तापमान पोषक ठरते.

कांदा लागवड करणे पुर्वी शेतीची खोलवर चांगली नांगरणी करुन घ्यावी. आद्रता युक्त वातावरणात कांदा लागवड करु नये.

रोगाच्या नियंत्रणासाठी – फेनामिडोन, क्लोरोथॅलोनिल, पायरॅक्लोस्ट्रोबीन, मॅन्कोझेब, मॅनेब यांचा वापर करता येईल.

पर्पल ब्लॉच (Purple Blotch)
पर्पल ब्लॉच (Purple Blotch)
पर्पल ब्लॉच (Purple Blotch)