logo

आयरिस यलो स्पॉट व्हायरस

कांदा पिकावरिल फुलकिडे (थ्रिप्स) मुळे पसरणारा हा रोग आहे. या रोगात पिकाची पाने पिवळी पडतात, व कालांतराने सुकुन जातात. रोगग्रस्त रोपाची पाने जमिनीकडे झुकन जातात.

कांदा पिकावरिल फुलकिडे हे रोपाच्या पानांच्या बेचक्यात राहतात, त्यामुळे पाने बाजुला सारुन पिवळ्या रंगाची किड तपासणे गरजेचे असते. फुलकिडे पानांतील रसशोषुन घेतात, कंद वाढीच्या सुरवातीच्या काळात लागण झाल्यास कांद्याची वाढ होत नाही. थ्रिप्स च्या हल्ल्यामुळे कांद्याची साठवणुक क्षमता देखिल कमी होते.

फुलकिडे (थ्रिप्स) नियंत्रणासाठी – सायपरमेथ्रीन, लॅम्डा साह्यलोथ्रिन, स्पिनोसॅड, मिथोमिल, मिथिल पॅराथिऑन यांचा वापर करता येतो.