logo

बोट्रायटिस

बोट्रायटिस स्क्वॅमोसा या बुरशीमुळे हा रोग होतो. रोगाची लागण झाल्यानंतर २४ ते ४८ तासांत पानांवर पाढ-या रंगाचे चट्टे दिसतात, त्यानंतर ५ ते १२ दिवसांनी पानांवर पिवळसर, तांबुस असे पट्टे जास्त प्रमाणात वाढतात. जुन्या पानांवर लक्षणे जास्त प्रमाणात आणि लवकर दिसुन येतात. उबदार वातावरणात (१६ ते २८ डिग्री सेल्सियस) रोगाची वाढ झपाट्याने होते. पानावर एक जरी चट्टा आढळुन आल्यास त्वरित उपाययोजना करावी.

अशा चट्ट्यांच्या भोवतालचा भाग हा हिरवट पांढरा दिसुन येतो. जास्त प्रमाणात रोगाची लागण झाल्यास पान सुकते, वाकुन जाते. कंदाची वाढ होत नाही.

रोगाच्या नियंत्रणासाठी क्लोरोथॅलोनि, मॅन्कोझेब किंवा मॅनेब चा वापर करावा.

बोट्रायटिस
बोट्रायटिस