
कांदा पिकावर कोलोक्टोट्रिकम ग्लेईओरिओडिस (Colletotrichum gleosporiodes) या बुरशीमुळे हा रोग होतो. या रोगात पिकाची पाने वेडीवाकडी वाढतात, कारण नसतांना पातीची वाढ जास्त होते, रोगाच्या सुरवातीला पानांवर ओलसर असे पिवळे डाग पडतात.
पानांच्या बेचक्यात काहीवेळेस काळसर अशी बुरशीची वाढ दिसुन येते.
रोगाच्या नियंत्रणासाठी – बेनोमिल, मॅन्कोझेब यांचा वापर करता येईल.

