logo

header-ad
header-ad

भुईमुग (Groundnut) अन्नद्रव्य व्यवस्थापन

अन्नद्रव्य व्यवस्थापन –

भुईमुग पिकाच्या मुळांवर रायझोबियम हा सहजीवी जीवाणू वास करित असतो. हा जीवाणू जर पिकाच्या मुळांवर व्यवस्थित आणि भरपुर प्रमाणात वाढत असेल तर अशी मुळे गुलाबी रंगाची दिसतात, मुळांवर भरपुर प्रमाणात गाठी तयार झालेल्या दिसतात. मुळांवर रायझोबियम च्या गाठी असल्यामुळे भुईमुग पिकांस वरुन नत्र युक्त खते देण्याची गरज भासत नाही.

भूईमुग पिकासाठी खत व्यवस्थापन – (प्रमाण किलो प्रती एकर)

लागवडीनंतर दिवस नत्र स्फुरद >पालाश >कॅल्शियम नायट्रेट >झिंक सल्फेट >फेरस सल्फेट >सल्फर >बोरॅक्स >किंवा २० टक्के बोरॉन
५-१० दिवस १० २५ २५ - - १० - - -
३०-३५ दिवस - - - १० १० - ५०० ग्रॅम
एकुण १० २५ २५ १० १० १० ५०० ग्रॅम

भुईमुग पिकात कॅल्शियम, फेरस, स्फुरद आणि सल्फर या खतांची गरज भासते.

सल्फर ची उपलब्धता होण्यासाठी सल्फर ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया चा वापर करावा. दाणे भरत असतांना बोरॉन चा वापर केल्यास दाणे पुर्णपणे भरण्यास मदत मिळते. भुईमुग पिकांत ६-बी.ए. या संजिवकाचा वापर फुल धारणा होण्यापुर्वी आणि दाणे भरत असतांना १० पीपीएम (१ ग्रॅम ६-बी.ए. १०० मिली सॉलव्हंट मध्ये विरघळवुन घेवुन हे द्रावण १०० लिटर पाण्यातुन, फवारावे) या प्रमाणात फवारणी केल्यास फुलांची संख्या वाढण्यास आणि दाणे भरण्यास मदत मिळते.

फवारणीतुन खत व्यवस्थापन -

भुईमुग पिकास खालिल प्रमाणे फवारणीतुन खते द्यवीत.

पिकाच्या वाढीची अवस्था फवारणीच्या खतांचा प्रकार प्रमाण प्रती लिटर पाणी
लागवडीनंतर १० - १५ दिवसांत 19-19-19 2.5 -3 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये 2.5-3ग्रॅम
वरिल फवारणीनंतर १५ दिवसांनी २० टक्के बोरॉन 1 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये 2.5-3 ग्रॅम
फुलोरा अवस्थेत 00-52-34 4-5 ग्रॅम
मायक्रोन्युट्रीएंटस् (ग्रेड नं २) 2.5-3 ग्रॅम
शेंगा पासत असतांना 00-52-34 4-5 ग्रॅम
बोरॉन 1 ग्रॅम
वरिल फवारणीनंतर ७ दिवसांनी 00-52-34 4-5 ग्रॅम