logo

फ्लिआ बिटल (Scelodonta strigicollis)

agriplaza, agriculture information, farming, grapes, wine

सक्रिय काळ व नुकसानीचा प्रकार

प्रौढ एप्रिल आणि ऑक्टोबर छाटणीनंतर येणा-या कोवळ्या फुटीवर उपजीविका करतात. प्रादुर्भाव जास्त असल्यास पानांवर देखिल उपजीविका करतात. ग्रब मुळांवर उपजीविका करतात, मात्र फार नुकासान कारक नाहीत. अळी लहान आकाराची काळसर पांढ-या रंगाची असते. अळी अवस्था ३४ ते ४५ दिवसांची असते. एका वर्षात ४ पिढ्या असतात. किडीचे छायाचित्र तमिलनाडु अग्रीकल्चर युनिव्हर्सीटी च्या वेब साईट वरुन.

अंडी देण्याचा काळ

सिगारच्या आकाराची फिक्कट पांढ-या रंगाची अंडी खोडाच्या सालीच्या खाली, किंवा खोडाच्या सालीमध्ये असलेल्या फटांमध्ये दिली जातात. मादी जीवन क्रमात २०० ते ६०० अंडी देते. अंड्यातुन ४ ते ८ दिवसांत पिल्ले बाहेर येतात.

सुप्तावस्था

सुप्तावस्था जमिनीत पुर्ण करते. सुप्तावस्था ७ ते ११ दिवसांची असते.

नियंत्रणाचे उपाय

इमिडाक्लोप्रीड, असिटामॅप्रीड, डायमेथोएट, मॅलेथिऑन इ. फवारणी घ्यावी.