logo

द्राक्ष तण व्यवस्थापन

तणनाशकाचे तांत्रिक नांव व केव्हा वापरावे उत्पादक कंपनी किंवा व्यापारी नांव अधिक माहीती(संदर्भ – यु.सी. आय.पी.एम., अमेरिका)
द्राक्ष लागवडीपर्वी शेत तयार करतांना, उगवुन आलेल्या तणाच्या निंयत्रणासाठी

पॅराक्वेट

ग्रामोक्झोन

तण १ ते ६ इंचाचे असतांना वापरावे. तणसोबत उगवुन आलेले किंवा पुर्नलागवड केलेले रोप देखिल मरुन जाते, त्यामुळे लागवड करण्यापुर्वी वापरावे. दुपारच्या उन्हात फवारणी केलेली जास्त फायदेशिर ठरते.

ग्लायफोसेट

ग्लायसेल, राउंडअप

तणाच्या उंचीवर बहुतांशी नियंत्रण अवलंबुन असते.

२-४- डी

२-४-डी

ग्लायफोसेट सोबत वापरण्यास उत्तम. लागवड करण्याच्या अगोदर वापरावे. जास्त प्रमाणात वापरु नये, रेसिड्यु जमिनीत राहत असल्या कराणाने, ज्या ठिकाणी रोपाची लागवड होणार आहे त्या जागे वर जास्त फवारणी करु नये.

द्राक्ष लागवड केल्यानंतर,तण उगवणीपुर्वी

ऑक्झिफ्लोरफेन

गोल

पिक लागवडीनंतर वापरता येते. वापरण्यापुर्वी उत्पादनाच्या माहीती पत्रकावरिल माहीती काळजीपुर्वक वाचुन त्यानुसार फवारणी घ्यावी. फवारल्यानंतर जमिनीची मशागत वै. करु नये त्यामुळे कमी प्रमाणात नियंत्रण मिळते.

डायुरॉन

डायुरेक्स

१ टक्क्यापेक्षा कमी सेंद्रिय कर्ब असलेल्या जमिनीत वापर टाळावा. तण २ इंचाचे असतांना फवारणी करावी. ३ वर्षापर्यंतच्या वेलींना तण नियंत्रणासाठी उपयुक्त ठरते. ज्या वेलीचे खोड १.५ इंचापेक्षा कमी जाडीचे असते, त्या वेलीच्या खोडाजवळ वापर करु नये. कमी प्रमाणात वापरावे.

द्राक्ष लागवड केल्यानंतर,तण उगवणीनंतर

ग्लायफोसेट

राउंडअप, ग्लायसेल

उगवुन आलेल्या तणांच्या नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. अधिक परिणांमासाठी ग्लायफोसेट पाण्यात मिसळण्याच्या अगोदर अमोनियम सल्फेट पाण्यात टाकुन मिसळुन घ्यावे. गवत ७ ते १४ दिवस कापुन काढु नये.

पॅराक्वेट

ग्रामोक्झोन

तण उगवणीनंतर वापरावे.