logo

आले पिकाचे खत व्यवस्थापन

आले पिकासाठी ७५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश अन्नद्रव्यांची प्रती हेक्टर साठी शिफारस केली जाते.

हि शिफारस प्रती एकर ३० किलो नत्र, आणि स्फुरद व पालाश प्रत्येकी २० किलो अशी होते. रासायनिक खतांची शिफारस करत असतांना ती फॉस्फोरस च्या बाबतीत P आणि पोटॅश च्या बाबतीत K ह्या नुसार केली जाते. वरिल शिफारस, P2O5, K2O ह्या रुपांतरती केली असता. २० किलो P प्रती एकर हा ती ५८ किलो P2O5 एकर तर २० किलो K हा २४ किलो प्रती एकर असा येतो.

म्हणजेच आले पिकाची रासायनिक खतांची शिफारस (N : P2O5 : K2O) हि ३० किलो नत्र, ५८ किलो स्फुरद आणि २४ किलो पालाश अशी येते. ह्या सोबतच प्रती एकर १० टन सेंद्रिय खताची देखिल शिफारस केलेली आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापिठात, आले पिकासाठी रासायनिक खते आणि सेंद्रिय खत ह्याच्या विविध प्रकारच्या मिश्रणातुन जे काही उत्पादनाचे निष्कर्श समोर आलेत ते ह्या ठिकाणी देत आहोत.

आले पिकाव्दारा सरासरी ११३ किलो नत्र (N), २९ किलो स्फुरद(P2O5) आणि १५८(K2O) किलो पालाश प्रती हेक्टर ग्रहण केला जातो असा निष्कर्श आलेला आहे.

परिमाण

उत्पादन (टन/हे)

टन/एकर

काहीही खत नाही

12.5

5

केवळ २५ टन प्रती हे. सेंद्रिय खत

13.22

5.2

केवळ शिफारस केलेला रासायनिक खतांचा डोस

22.37

8.9

रासायनिक खते + सेंद्रिय खत (शिफारस केलेले)

30.50

12.2

आले पिकाव्दारा सरासरी ११३ किलो नत्र (N), २९ किलो स्फुरद(P2O5) आणि १५८(K2O) किलो पालाश प्रती हेक्टर ग्रहण केला जातो असा निष्कर्श आलेला आहे.

आले पिकातील खत व्यवस्थापनात, पोटॅश ह्या अन्नद्रव्याचे महत्व हे अनन्य साधारण असे आहे. आले पिकाव्दारा पालाश खताच्या जास्त वापरास उत्तम प्रतिसाद दिला जातो.

पालाश सोबत, झिंक हे सुक्ष्म अन्नद्रव्य पिकात जास्त प्रमाणात फुटवे आणणे आणि स्टार्च निर्मितीत मदत करत असल्या कारणाने त्याचा देखिल लाभ उत्पादन वाढीत दिसुन येतो.

रासायनिक खतांतुन पिक संगोपन

कालावधी

खताचे नाव

प्रमाण प्रती एकर

बेड तयार करतांना

सिंगल सुपर फॉस्फेट

२५० ते ३०० किलो

 

म्युरेट ऑफ पोटॅश

५० ते ७५ किलो

 

कुजलेले शेणखत

१० टन

 

पोल्ट्री खत

२०० ते ३०० किलो

रोप उगवणीनंतर

 

 

१० ते १५ दिवस

अमोनियम सल्फेट

२० किलो

 

डी ए पी

५० किलो

 

एम ओ पी

५० किलो

२५ ते २८ दिवस

कॅल्शियम नायट्रेट

१० किलो

 

मॅग्नेशिय़म सल्फेट

१० किलो

३० ते ३५ दिवस

झिंक सल्फेट

१५ किलो

 

फेरस सल्फेट

१० किलो

 

मँगनीज सल्फेट

३ किलो

४५ ते ५० दिवस

मॅग्नेशियम सल्फेट

१० किलो

९० ते १०० दिवस

अमोनियम सल्फेट

१० किलो

 

डि ए पी किंवा १०-२६-२६

५० किलो

 

एम ओ पी

५० किलो

११० ते १२० दिवस

झिंक सल्फेट

१० किलो

 

फेरस सल्फेट

१० किलो

 

मॅग्नेशियम सल्फेट

१० किलो

१९० ते २१० दिवस

एम ओ पी

२५ ते ५० किलो

 

युरिया

५ ते १० किलो

२१५ ते २२० दिवस

झिंक सल्फेट

५ किलो

 

फेरस सल्फेट

५ किलो

२२५ दिवस

एम ओ पी

२५  किलो

 

युरिया

५ ते १० किलो

२३० दिवस

सल्फर

३ ते ५ किलो

 

आले पिकांत पालाश (पोटॅश) खताच्या कमरतेमुळे पानांवर पिवळे पट्टे पडतात. अनेक वेळेस हे पट्टे रोपावर काही रोगाची लक्षणे आहेत अशाच प्रकारची दिसतात. आले पिकातील पालाश खताचे महत्व लक्षात घेता, पिकास नियमित आणि टप्पे करुन पालाश खताची मात्रा द्यावी.

ह्या ठिकाणी देण्यात आलेली माहीती किंवा खतांचे शेड्युल हे केवळ मार्गदर्शक स्वरुपाचे आहे. त्यात वातावरण, पिकाचा हंगाम, मातीचा प्रकार, लागवडीचा प्रकार, लागवडीचे अंतर, पिकाचा वाण, मातीतील आणि पाण्यातील अन्नद्रव्यांचे प्रमाण ह्यानुसार योग्य तो बदल करावा. लेखक कोणत्याही स्वरुपाचे कौतुक अगर आभार किंवा टिका ह्यांची अपेक्षा न ठेवता शेतकरी वर्गास मोफत माहीती देण्यात केवळ रस दाखवतात, ह्या माहीतीचा वापर केल्यानंतर उदभवणा-या कोणत्याही परिस्थितीची आम्ही कोणतिही जबाबदारी घेत नाहीत, ह्याची कृपया नोंद घ्यावी.