logo

शेवगा | DrumStick खत व्यवस्थापन

खत व्यवस्थापन

शेवगा हे पिक तसे रासायनिक खतांच्या बाबतीत फार चोखंदळ असे पिक नाही.

शेवगा पिकाच्या शेंगांच्या अन्नद्रव्याचे विश्लेषण केल्यास आपणास दिसुन येते कि, त्यात व्हीटामीन सी – १२० मि.ग्रॅ/१००ग्रॅ., कॅरोटिन ११० मि.ग्रॅ./१००ग्रॅ, फॉस्फोरस ११० मि.ग्रॅ/१०० ग्रॅम, मॅग्नेशियम २८ मि.ग्रॅ/१०० ग्रॅम, पोटॅशियम २५९ मि.ग्रॅ./१०० ग्रॅम, सल्फर १३७ मि.ग्रॅ./१०० ग्रॅम, आणि क्लोरीन ४२३ मि.ग्रॅ./१०० ग्रॅम इतक्या प्रमाणात विविध पोशक तत्वे आढळुन येतात.

शेवगा पिकांस एका वर्षाला एका रोपासाठी ८ ते १० किलो चांगले कुजलेले शेणखत द्यावे.

रासायनिक खते

बागायती परिस्थितीत शेवगा पिकाची लागवड केली असता त्यासाठी प्रती रोप ५६ ग्रॅम नत्र, २२ ग्रॅम स्फुरद आणि ४५ ग्रॅम पालाश आणि अझोस्पिरिलम हे नत्र स्थिर करणारे जीवाणू आणि स्फुरद विरघळवणारे जीवाणु हे लागवडीच्या वेळेस दिले गेले, अशा परिस्थितीत प्रती हेक्टर ४५.९० मे.टन इतके जास्त उत्पादन मिळविण्यात आलेले आहे.

संशोधनानुसार १ वर्ष वयाच्या रोपांस प्रती रोप २५० ग्रॅम नत्र, १२५ ग्रॅम स्फुरद, १२५ ग्रॅम पालाश प्रती रोप दिले असता जास्तीत जास्त उत्पादन मिळते ( ११७ शेंगा प्रती रोप, ५.२४ किलो शेंगा प्रती रोप) मात्र आर्थिक नफा हा २०० ग्रॅम नत्र, १०० ग्रॅम स्फुरद आणि १०० ग्रॅम पालाश व्दारे मिळतो.

पाणी व्यवस्थापन

शेवगा हे तसे कमी पाण्यात येणारे पिक आहे.

ज्यावेळेस पिकाची लागवड हि संरक्षित पाणी उपलब्ध असतांना ड्रिप ईरिगेशन न वापरता केली जाते तेव्हा पिकास पाऊस नसतांनाच्या काळात महिन्यातुन एकदा पाणी दिले गेले त्यावेळेस १६.८६ मे.टन इतके उत्पादन प्रती एकर मिळाले. पिकास १० ते १५ दिवसांतुन एकदा पाणी दिले तरी पुरेसे होते.

ड्रिप ईरिगेशन असेल तर उन्हाळाच्या काळात ८ ते १० लि. पाणी प्रती दिवस ( २ लि. क्षमतेचे ड्रिपर ४ तास) आणि ईतर काळात त्याच्या निम्मे म्हणजेच ४ ते ५ लि. पाणी प्रती दिवस (२ लि. क्षमतेचे ड्रिपर २ तास) दिल्यास पिकापासुन चांगले उत्पादन मिळते.