logo

header-ad
header-ad

टारगेट लिफ स्पॉट

कोरनीस्पोरा कोसिकोला ह्या बुरशीमुळे कापुस पिकावर टारगेट लिफ स्पॉट हा रोग आढळुन येतो. उबदार वातावरण, दमट हवामान आणि जास्तीच्या पाण्यामुळे ह्या रोगाची लागण कापुस पिकाच्या तळाकडील पानांवर दिसुन येते. पानांवर आकाराने कंचित मोठ्या (१० ते २५ मिमी) अशा गोलाकार किंवा अनियमित आकाराचे ठिपके पडतात. वातावरण रोगासाठी पोषक असल्यास हा रोग तळाकडिल पानांकडुन शेंडयाच्या पानांकडे वाढत जातो. वातावरणातील आर्द्रता कमी झाल्यास रोगाची प्रादुर्भाव देखिल कमी होतो.

स्टेंफॅलियम लिफ स्पॉट
टारगेट लिफ स्पॉट

ज्या पिकात उत्तम अशी बोंड धारणा झालेली असते अशा पिकात अनेक वेळेस अन्नद्रव्य कमतरता जास्त प्रमाणात जाणवते आणि अशा पिकावर पानांवरिल ठिपक्यांच्या रोगाचे प्रमाण वाढीस लागते. अशा परिस्थित पिकास संतुलित खते दिल्यास आणि पिकासाठी पाण्याचे योग्य नियोजन केल्यास कमीतकमी बुरशीनाशके वापरुन रोग आटोक्यात आणणे शक्य आहे. केवळ बुरशीनाशकांचा वापर करुन रोग नियंत्रणात येईल ह्या आशेने काम केल्यास मात्र हातात अपयशच येणार हे नक्की.

कापुस पिकावरिल विविध प्रकारच्या पानांवरिल डाग ह्या रोगांचे प्रमाण कमी ठेवण्यासाठी पिकास पालाश युक्त खतांचे, सोबत कॅल्शियम, झिंक आणि फेरस ची योग्य मात्रा देणे गरजेचे आहे. सध्या तरी ह्या रोगासाठी सरळ लबेल क्लेम असलेली बुरशीनाशके उपलब्ध नाहीत, त्यामुळे बहुआयामी बुरशीनाशकांचा वापर करणे हाच एक पर्याय आहे.

कॉपर युक्त बुरशीनाशके, प्रोपीनेब, मॅन्कोझेब, कार्बेन्डाझिम, झायरम ह्या सारख्या बुरशीनाशकांची फवारणी घेतल्यास फायदा होतो. नविन युगातील बुरशीनाशकातील पायरक्लोस्ट्रोबीन, एझोक्सोस्ट्रोबीन हि बुरशीनाशके देखिल वापरता येण्यासारखी आहेत.

रोगाच्या नियंत्रणासाठी पिकास फुलोरा अवस्थेत किंवा बोंड धारणा अवस्थेत फवारणी होणे गरजेचे आहे. पिकाच्या तळाकडिल पानांवर फवारणीचे द्रव्य पोहचु शकणे हे रोग नियंत्रणात सर्वाधिक महत्वाचे आहे.