logo

header-ad
header-ad

व्हर्टिसिलियम विल्ट

व्हर्टिसिलियम विल्ट
व्हर्टिसिलियम विल्ट

व्हर्टिसिलियम दहली ह्या बुरशीमुळे ह्या रोगाची लागण होते. रोगाची बुरशी पिकाच्या मुळांतुन शिरुन खोडात प्रवेश करते ज्यामुळे पिकाच्या अन्न आणि पाणी पुरवठ्यात अडचण निर्माण होते.

रोगाची लागण ही जास्त पाणी दिल्यास, सतत पाऊस लागुन राहील्यास होते. ज्या पिकात नत्राचा अतिरिक्त वापर आणि पालाश ची कमतरता आहे अशा ठिकाणी जास्त प्रमाणात रोगाची लागण होते

ह्या रोगात रोप तात्काळ मरत नाही, मात्र पाने गळुन जाण्याचे प्रमाण जास्त असते. रोगाच्या लक्षणात पानांच्या शिरांमधिल भाग पिवळा होतो. पानांच्या कडा देखिल पिवळ्या होतात.

मर रोगाचे नियंत्रणासाठी पिकास बागायती लागवड असेल तर नेमके गरजे इतकेच पाणी द्यावे.

बियाण्यास ट्रायकोडर्मा, बॅसिलस सबटिलिस, सुडोमोनास फ्लुरोसन्स ह्यांचा बीज प्रक्रिया म्हणुन वापर करावा.