
पानांवर जांभळ्या रंगाचे ठराविक भागावर ठिपके पडतात. काही पानांवर हे ठिपके पुर्ण पान देखिल व्यापु शकतात. हा रोग फुलकिड्यामुळे पसरतो. लागण झालेल्या रोपाकडुन निरोगी रोपाकडे हा रोग परागकणांतुन देखिल प्रसारित होतो.
अनेक वेळेस शेंड्या कडिल पानांवर पिवळ्या रंगाचे ठिपके पडतात, पानास सुज आल्यासारखे भासते.
ह्या रोगाची लागण फुलकिड्यामुळे होत असल्या कारणाने, फुलकिडे नियंत्रणासाठी उपाययोजना वेळीच करणे गरजेचे आहे.